
सहसंपादक: रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथील युवक जितेंद्र राजू पंधरे वय 31वर्ष हा इलेक्ट्रिक आय टी आय कोर्स करून असल्यामुळे गावातील लाईन फिटिंग करत होता. यातच तो आपलं व आपल्या परिवाराला मदत करत होता. अश्यातच आज दि.8/2/2024 रोजी चहांद येथून जवळच असलेल्या खडकी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात इलेक्ट्रिक पोल वरील जम्पर तुटल्याने जितेंद्र सकाळी साडे नऊ च्या दरम्यान तो जोडण्यासाठी तिथे गेला असता त्याचा जागीच शॉक लागून मृत्यू झाला
पण त्याला लाईन चे काम करण्यासाठी कोणी बोलविले हे मात्र अजून अस्पष्ट आहे.त्याच्या पश्यात लहान भाऊ आई,वडील असा आप्त परिवार आहे. जितू च्या जाण्याने पंधरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला जितू हा अंत्यत होतकरू व मनमिळाऊ स्वभावाचा तो परिवाराचा आधारस्तंभ होता.त्याचे शव विच्छेदणासाठी ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे नेण्यात आले. डाक्टरांनी वडनेर पोलिसाला कळविले तातडीने पोलीस जमादार सचिन रोकडे यांनी पंचनामा करून शव विच्छेदणासाठी डॉ. राठोड च्या सोबत राहून शव विच्छेदन करण्यात आले. पुढील प्रकरण वडकी पो. स्टे. यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल असे पोलीस जमादार सचिन रोकडे यांनी सांगितले.जितू च्या जाण्याने संपूर्ण चहांद गावात हळहळ व्यक्त होत आहे.
