कापणीची वेळ अन पावसाचा खेळ सोयाबीन कापणी व काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदल


सतत पडणाऱ्या पावसाने नुकत्याच पंधरा दिवसापासून उघड दिल्याने शेतात कापणीला आलेल्या सोयाबीनची शेतकऱ्यांनी कापणीची सुरवात केली परंतु आणखी तीन चार दिवसापासून पावसाने तालुक्यात सुरवात करून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी सोयाबीन कापणी करून ढीग लावण्याच्या कामासाठी धावपळ करीत आहेत. ग्रामीण भागामध्ये मजुराची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने बाहेर गावावरून तसदच शहरातून वाहनाद्वारे मजुरांची ने-आण करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होणार असून, उताऱ्यात घट येण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
तालुक्यात गत आठवड्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी सोयाबीन काढणीच्या कामाला लागले होते. गतवर्षी एकरी ३ ते ४ क्विंटलसोयाबीनचे उत्पादन झाले होते .मात्र यावर्षी तरी सोयाबीन चे उत्पादन चांगले होईल म्हणून वाटत होते मात्र यलो मॅझिक रोगामुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षीही सोयाबीनचा उतारा निम्म्यावर आला असून, त्यातच मजुरीचे दरही वाढले आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यात यंदा सोयाबीनचा सात हजार हेक्टरवर पेरा झालेला आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती.
ऐन राशीच्या वेळी तालुक्यात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, हवामान खात्याने येत्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेतामध्ये शिल्लक असलेल्या सोयाबीन कापणीच्या कामासाठी शेतकऱ्याची धावपळ चालू झाली असून, शहरातील मजूर ग्रामीण भागात घेऊन जाण्याची वेळ आली आहे.

मजुराच्या वाहतुकीचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांना पदर करावी लागत असल्याने शेतकरी वैतागून गेलेला आहे. काही भागातील शेतकरी मळणी यंत्राद्वारे सोयाबीनची रास करीत आहेत गतवर्षी सोयाबीन काढणीचे प्रती बॅग दर . ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रती बॅगा देऊनसुद्धा मजूर मिळत नाहीत. मजुरीचे दर आणि निम्मा उतारा येत असल्याने लागवडीचा खर्चही निघण्याची शक्यता कमी आहे.

बाजारात दर नसल्याने चिंता…

निसर्ग साथ देत नाही अन् बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सोयाबीनचे सध्या बाजारभाव ४ हजार ते ४२२ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिळत आहेत. सोयाबीन मधील ओलावा पाहून व्यापारी भाव करीत असल्याने सोयाबीनच्या लागवडीचा खर्च देखील शेतकऱ्याच्या हाती पडेल का, नाही याची शक्यता नाही, अशी भीती शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.