
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
ढाणकी शहरापासून नींगनूर फुलसावंगी असा महामार्ग गेला असून अनेक अडथळे पार करून नको तितकी यथेच्छ वृक्षाला जिवंतपणे कापून काढून मरण यातना दिल्या व निसर्गाची अगणित हानी झाली विकासाची “गती” गतिमान झाली ही बाब खरी असली आणि रस्ता उंच झाला असला तरी पण ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जावे लागते तेथे अडथळा निर्माण होत आहे. असे असताना सुद्धा संबंधित रस्ता बनवणारी जी कंपनी आहे त्या कंपनीची मोठ-मोठी वाहने महामार्ग होत असताना इतर ठिकाणी रस्ता बनवण्यासाठी जे गिट्टी लागते ते नेत असताना अक्षरशा पेरणी धरल्यासारखी ही बारीक गिट्टी सांडत असून यामुळे अपघात सुद्धा होऊ शकते त्यामुळे सर्वसामान्य जनता ही जीवमुठीत धरून प्रवास करत आहे तर एखाद्या वेळेस एखादा दुचाकी स्वार किंवा चारचाकी वाहन जात असताना त्या वाहनाचा टायर बारीक गिट्टीवरून गेल्यानंतर ती गिट्टी उडून डोळ्याला डोक्याला व शरीराला इतर ठिकाणी इजा होऊ शकते तसेच श्री बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये तर अक्षरशःहा महामार्गावर बारीक सदृश गीट्टी चे अंथरूण पडले आहे त्या ठिकाणावरून अनेक शाळेची वाहने जातात आणि सतत हा चौक गजबजलेला असतो त्यामुळे एखाद्या वेळेस वाहन घसरून अपघात सुद्धा होऊ शकतो
सर्वसामान्यांने जर कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याला लगेच कायदा दाखवून पुढील कारवाई अधिकारी करतात पण वाहनातून सांडत असलेली गिट्टी अपघाताला कारण ठरू शकते ही बाब त्यांच्या निदर्शनास काय येऊ नये की इथ सुद्धा गेंड्याची कातडी आहे का?? असा सुद्धा सवाल सर्व सामान्य वाटसरू उपस्थित करतो आहे अनेक शेतकरी या रस्त्यावरून जाणे येणं करतात त्यांच्यासोबत त्यांची जनावर सुद्धा असतात त्यांच्या खुरामध्ये त्या आकाराने लहान असलेलली गीट्टीचे अवशेष अटकून त्यांना इजा होऊ शकतात याचा विचार होताना दिसत नाही. शिवाय एखाद्या वेळेस रात्री अपरात्री एखादा रुग्ण आणायचा असल्यास बारीक चुरा सदृश्य सदर रस्त्यावर पडलेल्या गिट्टीमुळे वेगात असलेले वाहन घसरून अपघात सुद्धा होऊ शकते. गोविंदपुर आणि निंगणुर व इतर आजूबाजूची खेडेगावातील अनेक व्यक्ती ढाणकीला दुचाकी वाहनाने लहान मुलांना शाळेत आणून सोडण्यासाठी येत असतात तेव्हा त्यांच्यासोबत लहान मुले सुद्धा असतात अशावेळी दुचाकी घसरून अपघात सुद्धा घडू शकतो तसेच वाहतून करत असलेल्या वाहनातून सांडत असलेली गिट्टी काही इतर ठिकाणाहून थोडकीच येत असेल तर याच रोडवर चालत असलेल्या स्टोनक्रशर करत असलेल्या यंत्रणेशी असेल अशी चर्चा सर्वसामान्य वाटसरू करीत आहे तेव्हा संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कारवाई करणे जरुरी आहे
