
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दि २६ डिसेंबर रोजी नागपुर येथे राळेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा.डॉ.अशोकराव उईके यांच्या नेतृत्वात ना.
वनमंत्री सुधीरभाऊ मुंनगटीवार
यांच्या अध्यक्षतेखाली राळेगाव तालुक्याची वनविभाग संदर्भात शेतकऱ्यांना व गावकरी यांना येणाऱ्या समस्या तसेच मेंढीपालन करणाऱ्या लोकांना मेंढी चराई संदर्भात बैठक घेण्यात आली
या बैठकी दरम्यान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अडचणी जाणुन घेतल्या व त्यावर सर्व अडचणी सोडविल्या. तसेच राळेगाव भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे यांनी राळेगाव तालुक्यातील काही महत्वाच्या प्रमुख समस्या मांडल्या त्यात
1 ) चोंढी ते खैरगांव रस्ता करण्यासाठी वनविभाग ने त्यांच्या वनविभाग च्या क्षेत्रातुन परवानगी द्यावी.2)राळेगाव तालुक्यातील वनविभाग च्या क्षेत्राला लागुन असलेल्या गावांना जंगली प्राणी गावात न येऊ देण्यासाठी सिमेंटची प्रोटेक्शनवाल (कपाउंड) तयार करून दयावे.
3)राळेगाव तालुक्यातील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजने करीता नव्याने 15 गांवे समावेश करण्यासंदर्भात
या सर्व विषयावर वनमंत्री व आमदार डॉ अशोक उईके व अधिकारी वर्गानी सविस्तर चर्चा करून सर्व कामे मार्गी लावली. यावेळी बैठकीला राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा डॉ अशोकराव उईके,भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे,सदाशिवराव महाजण,माजी सभापती प्रशांतभाऊ तायडे, भाजपा सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ काकडे ,डॉ. भिमराव कोकरे,अनिल नंदुरकर, आशिष इंगोले,शारदानंद जयस्वाल, तसेच वनविभाग क्षेत्रातील लागुन असलेल्या गावातील सरपंच व गावकरी उपस्थित होते.
