
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शहरात महाराष्ट्र शासनाच्या जवळपास 13 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे. अनेक अंगणवाडी केंद्राची दुरावस्था झालेली आहे अंगणवाडी केंद्राला रंगरंगोटी नाही, दरवाजे खिडक्यांची तावदाने तुटलेली आहे. एक-दोन अंगणवाडी केंद्राची कंपाउंड वॉल तुटलेली आहे अंगणवाडी केंद्रात पायाभूत सुविधा देण्यासाठी व मोडकळीस आलेल्या इमारती पुन्हा बांधण्यासाठी शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून शहर प्रमुख शंकर गायधने, महिला आघाडीच्या शहर संघटिका पार्वता मुखरे, उपशहर प्रमुख देवराव नाखले, योगेश मलोंढे, श्रीकांत कोदाणे, सुनील क्षिरसागर, रोशन उताणे, रवी मेश्राम, निशी मोहन पोंगडे,वैभव दुधे,शेतकरी सेनेचे धनराजजी श्रीरामे इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांना निवेदन देण्यात आले.
शहरात अंगणवाडी केंद्रात वेगळी किचनची व्यवस्था नाही. अंगणवाडी केंद्रात शौचालय सुविधा नसल्यामुळे केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांची कुचंबना होत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील एक अंगणवाडी केंद्र जीव घेणे बनलेले आहे. केंद्रात प्राथमिक सोयीसुविधा नसल्यामुळे पालकांचा कल बालकांना कॉन्व्हेंट मध्ये पाठविण्याकडे आहे शहरातील महाराष्ट्र शासनाचा महिला बालकल्याण विभाग वाऱ्यावर दिसून येत आहे तर आठ नऊ वर्षापासून नगरपंचायत संस्था महिला व बालकल्याण विभाग असूनही अंगणवाडी केंद्राकडे दुर्लक्ष झाले आहे. यापूर्वी शिवसेनेकडून अंगणवाडी केंद्रातून बालकांना दिल्या जात असलेल्या निकृष्ट आहार बद्दल आवाज उठविण्यात आला होता. या अंगणवाडी केंद्राच्या दुरावस्थेबद्दल बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा यवतमाळ पूर्व यांना सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे.
याप्रसंगी
शिवसेना कार्यकर्ते सुधाकर शिखरे, महादेव मुखरे, लक्ष्मण डाखोरे, प्रभाकर धोटे, शारदा चुनारकर, किशोर नित, अनिल माळोदे, प्रवीण राऊत, मनोज राऊत, कवडुजी गवारकर,नारायण मेश्राम, सह कांता माणिकराम रामगडे, दीपक कोडापे, मनोहर कोहळे, कवडूजी जुनगरे, प्रभाकर एकोणकार, विनायक नगराळे, महादेव लांबाडे, नितीन कोहळे, जगदीश बोरपे, इत्यादी नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
