
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरखेडा ते सोनुर्ली मार्गावरून जात असलेल्या एका इसमास चाकुचा धाक दाखवित १ लाख ९० हजारांची बॅग तीन ते चार भामट्यांनी लंपास केली आहे. या घटनेतील आरोपी पोलिसांच्या रडारवर आहे.
विकास बाबाराव दवणे वय 25 वर्ष असे लुटमार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हे व्यवसाय खासगी नौकरी करतात. हे मुथ्थुट मायक्रोफिन लिमीटेड फायनान्स कंपनी मध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणुन काम करत असुन गावातील महीला बचत गटामध्ये लोन वाटप करणे व ते लोन पैशाचे रिकव्हर करण्याचे काम करतात. ग्राम मोहदरी, खैरगाव कासार, वरथ, सिंदेपोड, खेमकुंड सावारखेडा या गावांमध्ये जावुन मिटींग घेवुन लोनचे पैशाचे कलेक्शन करून अंदाजे 1,90,000/-रु लाल काळ्या रंगाच्या कापडी बॅगमध्ये पैसे ठेवुन सावरखेडा येथुन सोनुर्ली कडे येत असतांना चार अनोळखी इसमांनी त्यांना अडविले. चाकुचा धाक दाखवुन जबरीने त्यांच्या जवळील पैशाची बॅग हिसकावुन पळुन गेले. याप्रकरणी वडकी पोलिसांत तक्रार केली व वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदाराच्या आदेशाने २४ तासाच्या आत चारही चोट्यांना वेड्या टाकल्या. वडकी पोलिसांच्या माहितीने आरोपी 1. ओम शिवा विश्वास शिंदे वय 22, राहणार उत्तर वाढवणे तालुका नेर, 2 तुषार हुकुमचंद चावरे वय 22 राहणार सेवा नगर यवतमाळ 3. रोहित बबलू गोंधळे व 21 रा. सेवा नगर यवतमाळ, 4.राहुल हेमंत चावरे वय 22 रा. सेवा नगर यवतमाळ यांना दिनांक 7ऑक्टोंबर 2023 रोजी राळेगाव येथील न्यायालयामध्ये नेले असता त्यांना दोन दिवसाचा पीसीआर मिळाला आहे व पुढील कारवाई वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रशांत जाधव त्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.
