
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगांव तालुक्यातील रिधोरा येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे राळेगांव तालुका रुग्ण मित्र संजयभाऊ
गणपतराव गुरनुले यांचे जंतुनाशक फवारणी करण्याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन दिनांक २३ ऑगस्ट रोजी प्रहार जनशक्ती पक्ष शाखा रिधोरा यांचे वतीने रुग्ण मित्र तालुका प्रमुख संजय गुरनुले यांचें नेतृत्वाखाली गट विकास अधिकारी राळेगाव. यांना रीधोरा येथे जंतुनाशक फवारणी करण्याबाबत .निवेदन देण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून सचिव मॅडम राऊत व सरपंच यांना फवारणी बाबत विचारपूस केली असता. वेळ मारून नेत होते .सध्या गावागावात साथ रोगाने थैमान घातले असून. डेंग्यू मलेरिया .टायफाईड .चे रुग्ण आजुबाजुच्या परिसरात दिसून येत आहेत. त्यामुळे मी प्रहार जनशक्ती पक्षाचा तालुका रुग्ण मित्र असल्याने व माझी पत्नी सौ.वैशालीताई गुरनुले ग्रामपंचायत सदस्य असल्याने वेळोवेळी लोकांच्या समस्या माझ्या कडे व माझ्या पत्नी कडे येत असल्याने मी ग्रामपंचायत सचिव, सरपंच यांना तोंडी माहिती दिली परंतु त्यांनी माझ्या तोंडी सांगण्यावर दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी नाईलाजाने मला राळेगांव तालुका गटविकास अधिकारी श्री रविकांत पवार यांना निवेदन द्यावे लागले येत्या चार दिवसात जंतुनाशक फवारणी न केल्यास .प्रहारने गावपातळीवर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी संजयभाऊ गुरनुले (रुग्ण मित्र) संतोषभाऊ शिंदे. गणेशभाऊ जांभूळकर. मनोजभाऊ लोनबले .अमोलभाऊ लोनबले.गणेशभाऊ चौधरी उपस्थित होते.
