
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वॉर्ड क्र. 17 मधील नवयुवक दुर्गोत्सव मंडळाने आयोजित केलेली नृत्यकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण 33 बालकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांनी उत्कृष्ट नृत्यकौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
सर्व स्पर्धकांना वयक्तिक बक्षीस देण्यात आले, ज्यामध्ये 5 विशेष स्पर्धकांना ट्रॉफी आणि इतर बक्षिसांनी गौरविण्यात आले. यात पाच मुली विजेत्या आहे जिया बोभाटे, यशश्री पेंदोर, पुर्वा तेंलगे, वंशिका जुमनाके, पियु भोयर, मंडळाच्या या उपक्रमाचे गावातील नागरिकांनी भरभरून कौतुक केले असून, भविष्यात अशा सांस्कृतिक उपक्रमांची मागणी वाढू शकते, असे संकेत मिळत आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगर अध्यक्ष श्री बबनराव भोंगारे.प्रमुख पाहुने श्री अन्नाजी उईके.श्री डोमकावळे काका.श्री राजु भाऊ वैध्द.तथा पत्रकार बंधु श्री मनोहर बोभाटे कार्यक्रम चे आयोजन व सुत्रसंचाल श्री संदिप पेंदोर तथा सुधीर डोमकावळे.अरुन भाऊ शिवनकर.मोरेस्वर वाकटे.गजु भाऊ वैद.विजु भाऊ जामुनकर .अशोक खेकडे सर.पाल भाऊ.पवन भोंगारे पराग भोंगारे. अनुप उईकें, सुमित बेसेकर.तिवसे.गजानन डाखोरे.उमप साहेब .सदाशीव गवळी .शिव पेंदोर राम वैद आकाश वैद अमोल गहुकार .बंटी ठाकरे.महुर्ले तथा या कार्यक्रम चे परिक्षक श्री सतिश काकडे.सर व श्री जुमनाके सर.आभार काकडे सरानी केले
