
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
उपविभागीय अधिकारी यांना विविध ज्वलंत मागण्यांचे देण्यात आले निवेदन. यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने ओलादुष्काळ दुष्काळ करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये हेक्टरी दोन हेक्टर पर्यंत अनुदान तातडीने देण्यात यावे.
२०२३ चा विमा तातडीने द्या. २०२४, २०२५ मध्ये अतिवृष्टी झाली असल्याने शेतकऱ्यांचे पिक मालाचे नुकसान झाले आहे त्यामुळे तातडीने पिक विमा देण्यात यावे. पीएम किसानचे अनावश्यक कारणे दाखवुन शेतकऱ्यांना लाभापासून वचित करू नये. भूमिहीन शेतकऱ्यांना कसत असलेल्या शेतीचे पट्टे द्या. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेतीपयोगी साहित्याचे अनुदान हे तातडीने देण्यात यावे. या विविध ज्वलंत मागण्यांचे आपल्या शेतकऱ्यांच्या आहे. सरकार मागीतल्याशिवाय देत नाही. म्हणून अशोकभाऊ मेश्राम माजी वरीष्ठ पोलिस अधिकारी तथा राळेगाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालय राळेगाव यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन आपल्या ज्वलंत मागण्यांचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी राळेगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
