जय श्री राम जयघोषाने राळेगाव दुम दुमले भव्य, दिव्य तथा आकर्षक शोभा यात्रा ठरली लक्षणीय

सहसंपादक : रामभाऊ भोयर

श्री राम नवमी उत्सव समिती राळेगाव यांच्या वतीने भव्य, दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली, राळेगाव तालुक्यातील असंख्य श्री राम भक्त शोभा यात्रेत सहभागी झाले होते, जय श्री राम जयघोषाने राळेगाव शहर दुम दुमले,

यात श्री राम नवमी उत्सव समिती तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रश्न मंजुषा, रांगोळी, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या, सकाळी क्रांती चौक राळेगाव येथे महाआरतीने सुरुवात झाली व त्यानंतर शहरात बाईक रॅली काढण्यात आली,

सायंकाळी भव्य, दिव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यात भजन मंडळी, दिंडी, राम दरबार, विवीध झाकी, साउंड सिस्टीम, दुर्गावाहिनी तर्फे विशेष लाठी काठी चे प्रदर्शन दाखवण्यात आले, शोभा यात्रेचे आकर्षण बाहुबली हनुमान ठरले त्यांना बघण्याकरिता असंख्य लहान मुलांनी गर्दी केली होती,

श्री राम मंदिर येथून शोभा यात्रेला सुरुवात झाली आणि मुख्य मार्गाने जाऊन श्री राम मंदिर येथे समारोप झाला,

यात्रेची सुरुवात पालखी पूजन करून झाली त्यात आमदार डॉ. अशोकराव उईके सर, जानरावजी गिरी, अध्यक्ष गोपाल मशरू, संजय पोपट, बाळू धुमाळ, भूपेंद्र जी कारीया, अनिल वर्मा, प्रफुल चौहान, संदीप पेंदोर, डॉ अशोक थोडगे उपस्थित होते,
शोभा यात्रेकरिता विशेष सहकार्य अंकुश जी रामगडे, मेघश्याम जी चांदे,विकास वाघमारे, प्रा .अशोक पिंपरे, सुनीता ताई बोकिलवार,अर्चना ताई क्षीरसागर, संतोषी ताई वर्मा, कु. अचाल चौधरी यांनी केले

श्री राम नवमी उत्सव समिती चे सर्व पदाधिकारी, सदस्य, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गावाहीनी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सदस्य यांनी शोभा यात्रेत सहभाग घेतला, विविध समजिक, राजकीय संघटने कडून चौका चौकात राम भक्ताकरीता शरबत, पाणी, अल्पोहार ची व्यवस्था करण्यात आली होती,
भव्य, दिव्य शोभायात्रा यशस्वी केल्याबद्दल समस्त श्रीराम भक्तांचे अभिनंदन करण्यात आले
अशी माहिती श्री राम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड प्रितेश वर्मा यांनी दिली.