नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रम उत्साहात

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

नवउत्साह दुर्गा मंडळ गांधी ले आऊट, राळेगाव यांनी नवरात्री उत्साहात विविध कार्यक्रम राबवून मंडळात नव चैतन्य निर्माण केले. भजन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, महिलांचा गरबा ,महिलांनी टाळांवर केलेले नृत्य, खो खो, चमचा लिंबू स्पर्धा, इतर खेळ खेळून मनमुराद आनंद घेतला.नशाबंदी मंडळांनी नशाबंदी पोस्टर प्रदर्शन करून तरुणांनी व्यसनांच्या दूर राहावे हा संदेश दिला. कार्यक्रमाचा बक्षीस समारंभ व कचरा गाडीतून कचरा नेणारा तरुण श्री मनोज शिंदे यांचा दुर्गा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

  

बक्षीस समारंभाचे अध्यक्ष श्रीमती सरलाताई देवतळे,यांनी महिलांचे कलागुणांचा गौरव केला.दरवर्षी असाच उत्साह कायम राहील अशी आशा व्यक्त केली. प्रमुख वक्ते युसुफ अली सय्यद पठाण यांनी सर्व धर्म समभाव संदेश दिला, व माई वगळे यांनी आनंद साजरा करायला वय नाही तर तरुण उत्साही मन हव म्हणून सर्व महिलांचा आत्मविश्वासपूर्वक पुढे जाण्याचा आशीर्वाद दिला. नवउत्साह मंडळाचे अध्यक्ष सौ राजश्री मडावी, सचिव सौ विजयाताई ढगे, उपाध्यक्ष कविता खेबुडकर यांनी कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले, व सहभागी स्पर्धांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता मंडळाचे सदस्य सौ कल्पना ढोरे, सौ छाया देवतळे, सौ कल्पना डाखोरे, सौ प्रणाली धुमाळ, कविता रोकडे, सौ सुनंदा कामडी, सौ नम्रता कावरे, सौ अनिता वगळे,सौ वनिता चौधरी, सौ.शीतल देवतळे,सौ जोशना सोनटक्के,सौ. राऊत, सौ छाया माकोडे,सौ. सुवर्णा खोकले, सौ ममता भटकर, सौ दवे, सौ डाखोरे ,सौ भटकर, सौ. भलमे, सौ. जीवने, कु. आरती गिरी, सौ भारती कडू,सौ.सोनू सालवडकर, सौ छाया धोटे, यांनी सहकार्य केले तसेच महेश भाऊ ढोरे ,महेश भाऊ गलांडे ,भटकर भाऊ,इंगोले,गणेशजी देवतळे, अमोल कोकडे, गोपाल कारेकर, यांनी यांच्या सहकार्याने मंडळाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.