
.
नांदगांव सहित बोंद्रूनी, शेलू , कोल्ही येथील भूमिहीन बेघर लोकांचा मोठा सहभाग.
सर्वांसाठी घरे शासनाची योजना असताना स्थानिक महसूल प्रशासन अक्ष्यम प्रमाणात दुर्लक्ष्य करीत असल्याचा आंदोलन कर्त्याचा आरोप
हिंगणघाट – दलीत आदिवासी फासे पारधी समाजातील लोकांनी परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय भूखंडावर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेले आहे सदर अतिक्रमण नियमानुकुल करण्यात यावे यासाठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते तथा दलीत पँथर चे केंद्रीय कार्याध्यक्ष जगदीश कुमार इंगळे यांच्या मार्गद्शनाखाली संघटनेचे युवा नेते सूर्या शास्त्रकार यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगणघाट येथे 1 मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन कर्त्याना मार्गदर्शन करताना जगदीश कुमार इंगळे यांनी सांगितले की सर्वांसाठी घरे हि योजना केंद्र सरकारची आहे त्याची अंमलबजावणी करण्या करिता तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केला परंतु दलीत आदिवासी फासे पारधी समाजातील लोकांना या शासन निर्णय प्रमाणे फायदा झालेला नसल्याचा आरोप भाई जगदीश कुमार इंगळे यांनी केला असून शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ नांदगांव बोंदुरणी कोल्ही शेलु येथील निवासी प्रयोजनासाठी असलेले अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी कच्चा घराचे पंचनामे स्थळ निरीक्षण प्रत्यक्ष मोका पाहणी करून निवासी अतिक्रमणधारकांच्या बायना प्रमाणे ग्राम सचिव यांनी शासन निर्णयाप्रमाणे गठीत केलेल्या शक्ती प्रद्दत समिती कडे सादर करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून आंदोलनाची दखल घेऊन नांदगांव येथील अहवाल सादर करण्याचे निर्देश गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना तर काचनगाव येथील कोलम समाजाच्या कब्ज्यात असलेले अतिक्रमनाचे प्रस्ताव अहवालासहित सादर करण्याचे निर्देश तलाठी, ग्राम सचिव ग्रा.प, काचनगाव यांना दिले पुढील गावातील सर्व प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संगटनेचे युवा नेते सूर्या भाई शास्त्रकार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले असून या आंदोलनात मानवी हक्क सुरक्षा दलाच्या डॉ रेखा कैलास खंदारे, महिला अध्यक्षा सौ कल्पना इंगळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा समशेर सिंग भोसले,फासे पारधी संघटनेचे अध्यक्ष विलास पवार,समुद्रपुर तालुका अध्यक्ष राष्ट्रपाल भोसले,रेखा गुंजेवार ,सुनीता गूंजेवर,शोभा हांडे,लक्ष्मी घाटे,विजय शंभरकर,सहित फासे,पारधी समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
