शेतमालाचे भाव हाच कळीचा मुद्दा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे निवडणूक ही काही दिवसावर येऊन ठेपल्याने निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहेत नुकतेच राज ठाकरे तसेच नितीन गडकरी यांची राळेगाव येथे सभा झाली या सर्व सभांमध्ये शेतमालाच्या भावावर फारशी चर्चा झाली नाही इतर सर्व मुद्दे सभा मधून घेतल्या गेले पण स्थानिक लोकांचा विचार करता शेती व शेतमालाचे भाव हे विषय सभांमधून प्रकर्षाने घ्यायला पाहिजे होते पण घेतल्या गेले नाही मतदार संघामध्ये फेर फटका मारल्यास शेतमालाचे भाव हाच कळीचा मुद्दा असल्याचे दिसते सद्यस्थितीत सोयाबीन तसेच कापसाला सन्मान जनक भाव नाही दिवाळीच्या दरम्यान मातीमोल भावात शेतकऱ्यांना आपले सोयाबीन विकावे लागले कापसाची सुद्धा याच्यापेक्षा चांगली स्थिती नाही ७००० किंवा त्याच्या ही पेक्षा कमी भावामध्ये शेतकऱ्याला आपला कापूस सध्या विकावा लागत आहेत हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्याला मिळत असलेला भाव हा बराच कमी आहे शेतकऱ्याचा मालं निघाल्या निघाल्या निघाल्याबरोबर शासनाने नाफेड तसेच सीसीआयच्या माध्यमातून सोयाबीन व कापसाचे खरेदी करायला पाहिजे पण तसे होत नाही या दोन्ही शासकीय एजन्सी खरेदीची सुरुवात करण्यास बराच वेळ घेतात सोबत खरेदी सुरू झाल्यावर अनेक नियम व अटी खरेदी बाबत घालतात की जेणेकरून शेतकऱ्यांचा कापूस तसेच सोयाबीन खरेदीच करावी लागणार नाही व नाईलाजाने शेतकऱ्याला व्यापाऱ्यांना आपला कमी भावात विकावा लागतो राळेगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर बहुतांश मतदार हे शेतकरी आहेत आणि शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे त्यामुळे शेती प्रश्नावर निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे पण तशी होताना दिसत नाही मतदारसंघाचा फेरफटका मारल्यास शेतीशी संबंधित अनेक प्रश्न अजूनही तसेच प्रलंबित आहेत पांदण रस्त्याचा शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न या प्रश्नावर मात्र अजून कोणी बोलत नाही आणि इतके वर्ष होऊ नये हा प्रश्न मार्गी लागलाच नाही या वर्षी कापसाचे तसेच सोयाबीनचे उत्पन्न अतिशय कमी आहे अतिवृष्टीचा या दोन्ही पिकाला फटका बसला सद्यस्थितीत कपाशी वरती गुलाबी बोंड अळी आली आहेत गुलाबी बोंड अळी मुळे कापसाचे निश्चितच उत्पादन कमी होणार आहे म्हणजेच उत्पादन कमी व भावही नाही अशा चक्रव्यूह शेतकरी सापडला आहेत अनेक वर्षांपूर्वीपासून कापसाचे तसेच सोयाबीनचे भाव हे वाढले नाहीत इतर सर्व वस्तूंचे भाव वाढत असताना शेतमालाचे भाव मात्र अनेक वर्षापासून आहे तेच आहेत जो भाव सोयाबीन तसेच कापसाला सध्या मिळत आहे या भावामध्ये शेतकऱ्याला सोयाबीन तसेच कापूस पिकवणे कितपत परवडते याचा अभ्यास सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांनी करायला पाहिजे पण तो होताना दिसत नाही सत्ताधारी तर शेतमाल भावा वरती बोलावयास तयारच नाही विरोधक सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये शेतमालाचे भाव किंवा शेतीशी निगडित प्रश्नाला पाहिजे तसे महत्त्व देताना दिसत नाही प्रत्यक्ष मतदानाला दहा दिवस उरले आहेत या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण या मुद्द्यांबरोबरच इतरही मुद्द्यावरती सत्ताधारी तसेच विरोधक चर्चा करताना दिसतात पण लाडक्या बहिणी पेक्षाही शेतकरी शेतमालाचे भाव व शेतीशी निगडित प्रश्न हेच कळीचे मुद्दे असल्याचे मतदारसंघातील नागरिकांच्या चर्चेअंती दिसते