यवतमाळ जिल्हा स्तरीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२२/२३ मध्ये राळेगाव उपविभागाची दमदार कामगीरी सांस्कृतिक कार्यक्रमात पटकाविला दुसरा क्रमांक

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्हा स्तरीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२२/२३ मध्ये राळेगाव उपविभागाची दमदार कामगीरी सांस्कृतिक कार्यक्रमात पटकाविला दुसरा क्रमांक
दिनांक २३/१२/२०२२ ते २५/१२/२०२२ पासुन यवतमाळ येथील नेहरु स्टेडियमवर महसूल विभागाने खेळाचे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले होते. त्यामध्ये एकुण जिल्हातिल उपविभाग स्तरावरुन सात व जिल्हाधिकारी कार्यालयात यांची एक टिम अशा आठ टिमानी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये मा. शैलेश काळे उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या अध्यक्षतेखाली व मा. डॉ. रविंद्रकुमार कानडजे तहसीलदार राळेगाव, सुनील चव्हाण तहसीलदार कळंब व श्री दिलीप बदकी नायब तह. किरण किन्नाके ना तह. राजु वेटे ना तह. अतुल देशपांडे ना तह. रेखा घर्डीकर ना तह. यांचे मार्गदर्शनाखाली सांघीक खेळांमध्ये खो-खो ( महिला) प्रथम क्रमांक व सांस्कृतिक कार्यक्रमात उपविजेतेपद पटकाविले. राळेगाव ची मयुरी कुडमेथे हिने ४, छाया दरोडे १, रजंनी मैदळकर १, मंजुषा सलाम १, मिना कुळसंगे १, वृशाली करपते १ , ममता कांबळे १, श्रीकांत तलवारे १, अतुल शिंगारपुरे १, प्रकाश तिरळे १, व इतर ३ जनांनी सुवर्ण पदक राळेगाव उपविभागास मिळवून दिले व सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये राळेगाव संघ उपविजेता राहीला त्यामध्ये प्रिया माकोडे, संध्या देशकरी, सोनाली चांदेकर , व इतर यांनी चांगली कामगिरी करत उपविजेतेपद पटकाविले या करीता कल्पेश वाढीवा, व इतर कर्मचारी यांनी परीक्षम घेतले तिन दिवस खेळांमध्ये सर्व अधिकार, कर्मचारी, सर्व तलाठी, सर्व कोतवाल यांनी सहभाग नोंदविला आहे.