तालुक्यात विनापरवाना देशी दारूची खुलेआम विक्री

प्रतिनिधी :कृष्णा चौतमाल,हदगाव

हदगाव : निवघा बाजार शहर व परिसरातील अनेक ठिकाणी विनापरवाना देशी दारूची विक्री केली जात आहे परंतु याचा बाबीकडे संबंधित पोलीस प्रशासन व दारू उत्पादन शुल्क अधिकारी यांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. निवघा मार्गावर अवैधरीत्या विक्री होणाऱ्या दारूमुळे अनेकांना आपले संसार उघड्यावर टाकून जावे लागत आहे. या संधीचा फायदा घेऊन निवघा बाजार तसेच जवळपासच्या अनेक खेड्यात विनापरवाना खुल्या दाम दुप्पट किमतीत अवैध देशी दारूची विक्री केली जात आहे या दारूमुळे अनेक सुखी संसाराची राख रांगोळी होऊन आजची तरुणाई व्यसनाधीन होत चालल्याची चित्र पहावयास मिळत आहे दिवसभरामध्ये अनेक तरुण नशीच्या तर आहारी जाऊन गावातील मुख्य रस्त्याने बोलताना पहावयास मिळत आहेत यामुळे सर्वसामान्य व प्रतिष्ठित नागरिकांचे राहणीमान धोक्यात आले आहे. विनापरवाना देशी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे तसेच कोळी येथे रसायन मिश्रित दारूमुळे परिसरातील अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे परंतु या बाबीकडे गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित पोलीस स्टेशन उत्पादन शुल्क अधिकारी याकडे तक्रार करूनही कुठलाही न्याय न मिळाल्याने ते हाताश होऊन विक्रेत्यांच्या मनमानी कारभारापुढे नमती झाले आहेत या भागांमध्ये दिवसेंदिवस अवैध विनापरवाना दारू विक्रेत्यांचा मनमानी कारभार वाढत असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे आता अवघड होत आहे विनापरवाना देशी दारू दाम दुप्पट किमतीमध्ये विक्री करून विक्रेते आपली पोळी भाजत असले तरीही त्यांचे अरेरावी मात्र वाढतच आहे सध्या परिस्थितीमध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा गाव आपले स्थापना गावोगावी झाली होती त्या उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी दारूच्या तर नसेल येऊन अनेक दारुडे समाजातील एकता भंग करण्याचे प्रकार घडत आहे होते बहुतांश आजचा तरुण वर्ग दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या आयुष्याची माती करून घेताना पाहावयास मिळत होत आहे परंतु संबंधित पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क अधिकारी मात्र या बाबीकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे सुज्ञ नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. सणासुदीच्या काळात अवैध देशी दारू विक्रेत्यांनी उच्चांक मांडल्याने परिसरामध्ये दारू पिणाऱ्या ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी अनेक गावातून तक्रारी होऊनही त्यांचे निवारण झाले नसल्याने प्रशासनाचा नागरिकांतून तीव्र निषेध केला जात आहे…