
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकिच्या तोंडावर मनसेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलांनी जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश करून मनसेचा झेंडा हाती घेतला.मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या स्वच्छ, ठाम आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असलेल्या विचारांनी प्रेरित होऊन, तसेच मनसे नेते राजुभाऊ उंबरकर यांच्या प्रभावी नेतृत्व आणि जनहितातील कार्याने प्रभावित होऊन अनेक उत्साही युवकांनी राज्य उपाध्यक्ष आनंदजी एंबडवार, जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.
या नव्या ऊर्जेमुळे मनसेचा झेंडा तालुक्यात आणखी उंचावणार आहे आणि युवकांच्या सहभागातून राळेगांव तालुक्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडणार आहे.
पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये चिखली गावातील
पवन वैरागळे, शैलेश ढोके, वैभव उमाटे, बादल नगराळे, प्रज्वल वनकर, नरेंद्र फुलमाळी, संघर्ष वैरागळे, प्रशिक आंडे, अजय फुलमाळी, वैभव हुलके, शुभम ठाकूर, मनोहर भोयर, रुपाली प्रमाद धनविज, प्रीती संघपाल वावरे, सिमा बालाराम लोखंडे, लंता झोडे, साधना राजु खैरे , वनीता अरुण फुलमाडी, नंदा विनोद फुलमाळी, सितल भोजराज नैताम, रोहिणी गावातील दिलीप ढेकणे, रोशन नेताम, विजय ठाकरे, नागोराव मुंडले, खुशाल बावने, बंडूजी पेदाम, सागर कापटे, दिनेश ढेकने, पवन मालने, प्रशांत बावने, मंगेश ढेकने, संदीप ढेकने, सुनील पेदाम, भोजराज नेताम, धानोरा गावातील राम जुनघरे, रोशन कापटे, ओम कापटे, रितेश येलके, कपिल गुजरकर, वैभव कामडी, स्वप्निल कुलसंगे, प्रणय नेताम, यश बोमले, दुर्गादास बोरकर, मयूर जुनघरे, आदित्य टेकाम, हनुमान जुनघरे, अविनाश कापटे यांचा समावेश होता.
या पक्ष प्रवेशासाठी तालुका उपाध्यक्ष सुहास उमाटे यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी तालुका सचिव संदिप गुरूनुले, वाहतूक ता. सरचिटणीस राहूल भोयर, धानोरा विभाग अध्यक्ष तुषार वाघमारे, अनिल वाढई, प्रमोद मांदाडे, भोजराज चौधरी, मंगेश मांदाडे उपस्थित होते.
