
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या व शेळगाव सर्कलमध्ये मोठा मतदार म्हणून ओळख असलेल्या वाटेफळगावमध्ये उपसरपंच बदलाचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत वाटेफळ ग्रामविकास आघाडीच्या पॅनलने एकुण नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत नऊ पैकी आठ जागेवर उमेदवार रिंगणात उतरवले होते आठ पैकी सात जागेवर उमेदवार निवडून एकहाती सत्ता स्थापन केली होती.अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान उपसरपंच यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.या पार्श्वभूमीवर गावातील इतर निर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना उपसरपंच पदाची संधी देण्याच्या हेतूने सरपंचांनी विद्यमान उपसरपंच पदाचा राजीनामा मागणी केल्याचे गावपातळीवर कुजबुज सुरु आहे.१३फेब्रुवारी२०२१ रोजी बिनविरोध सरपंच व उपसरपंच पदांची सर्वानुमते निवड करण्यात आली होती.सरपंच म्हणून सौ.अश्विनी दिपक भांडवलकर व उपसरपंच म्हणून संतोष माधव भांडवलकर यांची निवड निवडणूक अधिकारी श्री.भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती . काही महिन्यांपूर्वी उपसरपंच संतोष भांडवलकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करुन खळबळ उडवून राजकीय चर्चेला उधाण आले होते . उपसरपंच यांनी बरेच वेळा गैरवर्तणूक केल्याने इतर सदस्य देखील नाराज होते. मतदारांमध्ये वेगळा संदेश पोहचु नये म्हणून राजीनामा मागणी केल्याचे दिसून येते.पदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार यासाठी नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
