
वणी.शहरातील वसंत जिनिंग सभागृहात गुरुवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय पत्रकारिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा नि:शुल्क असून सकाळी 10 ते 5 वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. विदर्भातील नामवंत पत्रकार शिबिरार्थीना मार्गदर्शन करणार आहेत. स्माईल फाउंडेशन या सामाजिक संघटनेद्वारे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मोफत असले तरी यात पहिले नोंदणी करणा-या 70 व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. यातील 20 जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहे. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती शिबिरात सहभागी होऊ शकते. या शिबिराला वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील पत्रकार तसेच पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव व पत्रकार निकेश जिलठे यांनी केले आहे.
सदर शिबिर हे दोन सत्रात होणार असून पहिल्या सत्रात पत्रकारितेची ओळख, बातमी म्हणजे काय ? बातमीमुल्य म्हणजे काय? पत्रकारातील गुणवत्ता, बातमी लेखन,
बातमी लिहिण्याचे विविध प्रकार, बातमी लिखानाचे तत्व, विविध विषयाच्या बातम्या कशा लिहाव्यात? यासह प्रेस नोट लिखान, पत्रकार परिषद, भाषण-व्याख्यान बातमी, विश्लेषणात्मक बातमी, बातमीची भाषा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
दुस-या सत्रात फिल्ड रिपोर्टिंग, मॉडर्न मीडिया, मोबाईल जर्नालिज्म, डिजिटल मीडिया (पोर्टल, यूट्यूब चॅनल), रेव्हेन्यू मॉडेल, मीडिया लॉ आणि एथिक्स यासह शिबिरार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले जाणार आहे. 25 वर्षांनंतर प्रथमच वणीत पत्रकार प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार असून यात वणी व परिसरातील पत्रकारिता क्षेत्रात असणा-या तसेच पत्रकारिता क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन स्माईल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 9096133400 या क्रमांकावर संपर्क साधाता येणार आहे.
