ढाणकी:येथे गणपती विसर्जन शांततेत पार


ढाणकी:येथे गणपती विसर्जन शांततेत पार


ढाणकी येथे मिरवणुकीला एकूण १४ गणपती होते.बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांच्या एकीकडे डोळ्यात अश्रू तर,दुसरीकडे जलोष गणपती बाप्पाच्या मंडपात दहा दिवस उटणे ,बसणे विविध विषयांवर चर्चा विनिमिय, डेकोरेशन,सजावट, पुज्या आरती विविध कार्यक्रम, उत्सवाचे दिवस कुणीकडे गेले कळलेच नाही. आणि आज अनंत चतुर्दशी वेळ आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची आज त्या मंडपातली गणपती बाप्पाची शेवटची आरती झाली अन् डोळे पाणावले आरती संपली ,गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या कंठ दाटलेल्या आवाजात गणेश भक्तांचे आवाज निघत होते.पूजा आरती झाल्या नंतर वाजत गाजत ,ढोल ताश्याच्या आवाजात सर्व गणपती आठवडी बाजार येथे जमले ,तिथून गावातील मुख्य मिरवणुक मार्गाने मिरवणुक सुरू झाली. दोन वर्षाच्या महामारीच्याकाळात कोणतेही उत्सव, मिरवणुक न जमल्या कारणाने या वर्षी गणेश भक्तांच्या उत्साह जास्तच पहावयास मिळाला.वरून आभाळ दाटलेले, पाऊस सुरू असताना पण गणेश भक्त धूम धडाक्यात आपआपल्या मंडळा पुढे ढोल ताशे, डिजे,यांच्या तालात आनंदाने नाचत होते. मिरवणुकीत कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नये खबरदारी मनून चोक पोलिस बंदोबस्त तैनात होता,तसेच सर्व गणेश मंडळांनी याची खबरदारी घेतलेली दिसून आली. गावातीलनेतेमंडळी ,समाजसेवक,शांतता कमिटी सदस्य,पत्रकार संघ,वरिष्ठ मंडळी ,पोलिस प्रशासन यांनी मोलांची कामगिरी बजावत अतिशय शांततेत मिरवणुक पार पडावी म्हणून मोलाचे सहकार्य केले बीटरगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप बोस,उपनिरीक्षक नाईक साहेब,व संपूर्ण पोलिस प्रशासन यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे संपूर्ण गणेश मंडळ व गावातील लोकांनकडून अधिक उत्सवाचे वातावरण पहावयास मिळाले.अशा प्रकारे अतिशय शांततेत मिरवणुक पार पडली.गणेश विसर्जन गांजेगाव येथील पैनंगांगा नदीत करण्यात आले.