
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवशीय छत्रपती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यात शिव सामान्य ज्ञान स्पर्धा…. वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा स्पर्धा महिलांची वेशभूषा स्पर्धा किल्ले स्पर्धा अशा विविध स्पर्धा संपन्न झाल्या तसेच एडवोकेट निलेश सोनटक्के यांनी अष्टपैलू छत्रपती या विषयावर मार्गदर्शन केले याप्रसंगी ६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले यात दहा महिलांचा समावेश होता महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला सकाळी आठ वाजता बाईक रॅली काढण्यात आली तर याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला….. याप्रसंगी त्यांनी राळेगाव येथील शिवतीर्थ परिसर सुशोभित करण्याचे आश्वासन दिले या कार्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही असेही त्यांनी सांगितले याप्रसंगी उपविभागीय अधिकारी विशाल खत्री तहसीलदार अमित भोईटे भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे शहराध्यक्ष डॉ कुणाल भोयर प्रशांत तायडे डॉ संतोष कोकुलवार बबन भोगारे डॉ भीमराव कोकरे संदीप पेदोर डॉ मनोज पांगुळ संजय घीया यांची उपस्थिती होती सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप टूणे नगरसेविका मोहिनी बोबडे कविता कुडुमते मंगेश राऊत इम्रान पठाण ॲड मंगेश बोबडे अॅड अल्पेश देशमुख राजेंद्र नागतुरे भानुदास राऊत विजय तायडे सुरेंद्र ताठे अशोक राऊत कृष्णाजी राऊळकर इतर मान्यवरांची उपस्थिती होती.. महिलांच्या वेशभूषा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शोभा इंगोले माजी गटशिक्षण अधिकारी सरला देवतळे नुपूर कोमेरवार मृणाल उत्तरवार तबस्तुम शेख मेधा देशमुख…. सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली यात मा साहेब जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा केलेली युवक विशेष आकर्षण होते इंडिया शिवकालीन मर्दानी खेळ लाट्या काट्या यासह आकर्षक देखावे शोभायात्राचे विशेष आकर्षण होते; सर्व कार्यक्रमाचे संचालन प्रा रंजय चौधरी राजू रोहनकर शंकर माहुरले यांनी केले शिव महोत्सव संपन्न करण्याकरिता नितीन कोमेरवार दिलीप कन्नाके संजय दुरबुडे राहुल बहाळे वैभव इंगोले रुपेश कोठारे शुभम सीडाम अक्षय विरुलकर बंडू इंगोले अरविंद तामगाडगे नितीन कोरडे मंगेश पिंपरे सय्यद लीयाकत अली यांनी परिश्रम घेतले
