
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम
पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर येथे वास्तव्यास असलेल्या मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाळा चालवीत असलेले श्री. पुंडलीक जैराम मेश्राम यांच्या घराला शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागल्याने घरातील वस्तु कपडे जळुन राख झाले मजूरी करून जपून ठेवलेली रोखरक्कम पंधरा हजार रुपये सुद्धा यात जळाले असून संबंधीत कुंटुबावर आर्थिक संकट ओढावले आहे दिनांक १८/०५/२०२४ रोज शनिवारला रात्री ८:०० वाजताच्या दरम्यान संबधीत कुटुंब आपले जेवन आटोपून बाहेर अंगणात बसले होते मात्र अचानक विजेचा शार्टसर्कीट झाला आणि क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले मात्र आग इतकी भयानक होती की, घरातील सर्व सामान व रोखरक्कम जळून राख झाली सुदैवानी यात कोणतीहि जीवीत हानी झाली नाही मात्र अत्यंत हालाखीच्या परीस्थीतीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेले पुंडलीक मेश्राम हे आर्थिक विवंचनेत सापडले असून सदर घटणेचा पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकर्याकडून केली जात आहे
