विदर्भ मराठवाडा सीमेवरील ओसंडून वाहतोय निसर्ग रम्य सहस्रकुंड धबधबा

प्रतिनिधि:शेख रमजान बिटरगांव ( बु )

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, ओनाळे आणि धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत. उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या या जलधारा अंगावर झेलण्याची मजा काही औरच असते. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधबा नुकतंच प्रवाहित झाला आहे.असुन निसर्ग रम्य पैनगंगा अभयारण्यच्या खुशीत असलेला
सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. या धबधब्याचा काही भाग यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात येतो, तर काही भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात येतो. सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर आहे, जी मराठवाडा आणि विदर्भाला विभाजित करते. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटकांसोबतच हा धबधबा महाराष्ट्रभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. नदीचा प्रवाह एका मोठ्या खडकाने विभागला जातो ज्यामुळे पाणी दोन वेगळ्या प्रवाहांमध्ये येते. नदीच्या अलीकडील प्रवाहातील हा सर्वात मोठा धबधबा आहे.पावसाळयात सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी असते.पावसाळयात धबधबा प्रवाहीत होऊन पैनगंगा अभयारण्याचे निसर्ग सौंदर्य फुलले आहे .यामुळे पर्यटकांची ओढ सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी वाढत आहे.तसेच दिवसांत जंगलातील वन्य प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे,
पावसाच्या पाण्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून सहस्रकुंड धबधबा मनमोहक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.