
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव च्या विद्यार्थ्यांनी एच.एस.सी परिक्षेत तालुक्यात कला शाखेत द्वितीय क्रमांक पटकाविला.आणि तालुक्यात जे सात विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये आले आहे त्यातील चार गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यालयाचे आहे.
सुहाणी गजानन कोल्हे प्रथम,सुदेशना सुंदरदास वैरागडे,व्दितीय, मिनाक्षी मधुकर राव गलाट तृतीय,साहिल विलास मुंगले चतुर्थ व भावेश नरेंद्र बुरले,पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले,ते या यशाचे श्रेय आपल्या शिक्षकांना देतात .संस्थेचे अध्यक्ष रविभाऊ एम्बडवार, प्राचार्य राजेश शर्मा, प्राध्यापक प्रभाकर लाकडे, प्रा.अनिल चाफले व प्रा.श्रीहरी नरड यांना देतात .
