महादीप परीक्षेत राळेगाव तालुक्यात खैरी वडकी केंद्राचा डंका

सहसंपादक : रामभाऊ भोयर

प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग( प्राथमिक) यवतमाळ यांच्याद्वारे राबविल्या जाणाऱ्या महादिप उपक्रमांतर्गत राबविल्या जाणारी महादिप परीक्षेमध्ये राळेगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय महादिपरीक्षेत खैरी व वडकी केंद्रातील विद्यार्थ्यांनी तालुक्यात आपले वर्चस्व कायम ठेवून खैरी वडकी केंद्राचा डंका कायम ठेवला आहे.
प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक )यवतमाळ द्वारा राबविल्या जात असलेल्या महादीप परीक्षेमध्ये केंद्रस्तरीय परीक्षेत उत्तीर्ण होऊन तालुका स्तरीय परीक्षेसाठी उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील विद्यार्थ्यांची राळेगाव येथे तालुकास्तरीय महादीप परीक्षा झाली त्यात तालुक्यामध्ये खैरी वडकी या दोन केंद्रातील विद्यार्थ्यांचे वर्चस्व कायम राहिले असून यात तालुक्यातून वर्ग पाच ते आठ या वर्गामध्ये झालेल्या परीक्षेत खैरी व वडकी या दोन केंद्रातील विद्यार्थीच तालुक्यात प्रथम आलेले आहेत. वर्ग पाचवा मध्ये वडकी केंद्राचा विद्यार्थी तर वर्ग सहावा, सातवा व आठवा मध्ये खैरी केंद्राचे विद्यार्थी तालुक्यातून प्रथम आलेले आहेत.
खैरी केंद्राने सहाव्या, सातव्या व आठव्या वर्गात तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला असून इयत्ता सहावी मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेची विद्यार्थिनी कुमारी साक्षी सरपटे ही तालुक्यात प्रथम आली असून इयत्ता सातवी मध्ये खैरी केंद्रामधीलच पिंपरी (सा.) जिल्हा परिषद शाळेची कु .दुर्गा गार घाटे तर इयत्ता आठवी मधून आष्टोना जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थीनी कू.सनवी येरगुडे ह्या विद्यार्थिनी राळेगाव तालुक्यातून प्रथम आलेले आहेत तर वर्ग पाचवा मध्ये जिल्हा परिषद शाळा पिंपळापुर वडकी केंद्राचा विद्यार्थी आर्यन पाटील हा तालुक्यातून प्रथम आलेला आहे. तर इतर उत्तीर्ण प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खैरी व वडकी केंद्राचे वर्चस्व राहिले असून त्यामध्ये वर्ग पाच मध्ये वडकी केंद्रातील पिंपळापूर शाळेचे विद्यार्थी हर्ष राऊत, धनश्री चौधरी, हर्षदीप सातकर हे उत्तीर्ण झालेले आहेत तर वर्ग सहा मध्ये खैरी केंद्रामधून जिल्हा परिषद शाळा खैरी च्या विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी झाडे ,संबोधी भारशंकर पिंपळापूर शाळेच्या विद्यार्थिनी मनस्वी गावंडे ,श्रावणी आगास कांडे, अष्टोणा शाळेचा विद्यार्थी प्रदीप देवतळे तसेच वर्ग सातवा मधून खैरी केंद्रातील पिंपरी सावित्री येथील विद्यार्थी कुमारी दुर्गा गारगाटे ,संस्कार चांभारे वडकी केंद्र मधून पिंपळापूर शाळेचे विद्यार्थी प्रियांशु सातकर, मृणाली नहाते ,पुनम कोहळे, निधी लिहितकर तसेच वर्ग आठवा मधून खैरी केंद्रातील आष्टोना व पिंपरी शाळेचे विद्यार्थी सनदी येरगुडे ,साक्षी मेश्राम, आरती पिंपळ शेंडे ,संकेत होरे अंसिका बोडे त्या विद्यार्थ्यांनी तालुक्यातून घवघवीत यश घेत राळेगाव तालुक्यात महादीप परीक्षेत खैरी वडकी केंद्राचा डंका कायम ठेवला. या महादीप परीक्षेत तालुक्यात खैरी वडकी केंद्राच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे परिसरात तसेच तालुक्यात कौतुक होत असून या विद्यार्थ्यावर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे.