
…
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व भारतीय नारी रक्षा संघटना जि.यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी .अमोल येडमे व पोलीस अधीक्षक .दिलीप भुजबळ ,समाज कल्याण अधिकारी .चव्हाण ,यांना रक्षा बंधन निमीत्त व्यसनमुक्ती या कार्यक्रम अंतर्गत रक्षा बंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.तसेच भारतीय नारी रक्षा संघटना च्या सौ.मनिषाताई तिरणकर ,सौ.संतोषीताई वर्मा यांनी रक्षा बंधना निमीत्त प्रशासकिय अधिकार्यांना महीलां बाबत जे अत्याचार होत आहे,त्या साठी कठोर भुमिका घ्यावी आणि हीच खरी ओवाळणी आमच्या सर्व बहीनीनां होईल, त्यावेळी यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य अॅड. रोशनी वानोडे (सौ कामडी), यांनी अधिकाऱ्यांना व्यसनमुक्तीची राखी बांधून रक्षाबंधन हा कार्यक्रम साजरा केला, यावेळी .प्रा. वसंत कंगाले, . सुकांत वंजारी यांनी सहकार्य केले.
