
खासदार बाळू धानोरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली
स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासाठी गेल्या 117 वर्षापासून सतत आंदोलन सुरू आहे मात्र राजकीय पक्ष विदर्भातील नागरिकांच्या या ज्वलंत मागणीला आपल्या सोयीनुसार वापरून नन्तर सोडून देतात विदर्भ महाराष्ट्रात सामील झाल्यापासून विदर्भावर मोठा अन्याय झाला आहे विदर्भाची सुपीक जमीन, पाणी,खनिज या खनिजावर आधारित मोठे प्रकल्प ,विद्युत निर्मितीचे प्रकल्प अश्या विकासासाठी सर्व अनुकूल बाबी असतानाही येथील जनता येथील जनता हालपेष्टा सहन करीत आहे मात्र विदर्भाच्या वाट्याला नागपूर करार केल्याप्रमाणे काहीच काहीच प्राप्त झाले नाही हो अत्यन्त दुर्देवी बाब आहे म्हणून विदर्भच्या सर्व जिल्ह्यात विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारे आंदोलन सुरू आहे 10 ही खासदारांनि त्यांची व त्यांच्या पक्षाची विदर्भ राज्य निर्मिती बाबत काय भूमिका आहे ते जाहीरपणे स्पष्ट करावे यासाठी खासदारांना पत्र व्यवहार आंदोलन सुरू होता मात्र आज थेट चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी खासदार महोदयांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले माझा आणि माझा पक्षाचा विदर्भाला पाठिंबा आहे.त्यांनी देवेन्द्र फडणवीस यांच्यावर आरोप करत म्हटले की विदर्भ झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही अशी शपथ श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती तर सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा विदर्भ मिळावं या करिता सतत आंदोलने केली यांनी खऱ्या अर्थाने विदर्भच्या जनतेशी बेईमानी केली आहे.या आंदोलनाच नेतृत्व वामनराव चटप साहेब यांनी केले यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

