रावेरी येथे भा.ज.पा. नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचा सत्कार

              

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव मतदार संघाच्या विकासाकरीता मी कटिबद्ध :- आमदार प्रा डॉ. अशोक उईके

राळेगाव मतदार संघ हा आदिवासी करिता आरक्षित असलेला मतदारसंघ आहे राळेगांव, कळंब व बाभुळगाव व रुंझा सर्कल अशी मतदारसंघाची रचना आहे आदिवासी बहुल असणाऱ्या या मतदारसंघात मागील नऊ वर्षात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे झालेली आहे, गाव पोड तांडा वस्ती मतदार संघातील मंदिराच्या परिसराच्या विकासा पासून शहराच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाच्या युती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे . करोडो रुपयांच्या निधीतून विकासात्मक कामे पूर्ण झाली असून रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे . मतदारसंघातील सामान्य माणूस हा माझ्या विकासाचा केंद्रबिंदू असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरता मी कटीबद्ध आहोत असे विचार आमदार प्रा . डॉ अशोक उईके यांनी रावेरी येथे आयोजीत भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचीत जिल्हा पदाधीकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्या सत्काराच्या वेळेस बोलतांना व्यक्त केले . भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधीकारी बूथ प्रमुख कार्यकर्ता पक्षाच्या कामात स्वताला झोकून काम करतो तो पक्षाकरीता तेव्हढाच महत्वाचा आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रा डॉ. अशोक उईके होते जिल्हा महामंत्री अँड प्रफुल चौहान प्रकाश भूमकाळे अनिल राजूरकर चित्तरंजन कोल्हे तालुका अध्यक्ष , सतीश मानलवार कैलास बोन्द्रे आनंद वैदय संदिप वैद्य कुणाल भोयर अनिकेत पोहेकर कार्यक्रमाला उपस्थीत होते . उपस्थीतांना मार्गदर्शन करताना आमदार उईके म्हणाले भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विकासाचं राजकारण करतात मतदार संघातील प्रत्येक गावात जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येकाला घरापर्यंत पाणी मिळण्याची सोय शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिली आहे यासाठी कुठेही निधीची कमतरता पडलेली नाही प्रत्येक समाजासाठी सामाजिक भावनांची निर्मिती आमदार निधीमधून करून दिली आहे . मतदारसंघातील बहुतांश गावात मुख्य ठिकाणी हाय मास्क लावलेले आहे गावे प्रकाशमान झाली आहे शहरातील ओपन प्लेस ला कंपाउंड साठी निधी दिला आहे उत्तम आरोग्य रहावे यासाठी मुलांना व्यायामाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहे व्यायाम शाळेचे साहित्य दिले आहे . मतदारसंघातील मुख्य रस्ते गाव खेड्यातील रस्त्यांची कामे सुरू झाली आहे सर्वसामान्य माणसाला येण्या जाण्यासाठी त्रास होऊ नये याकरिता रस्त्यांची कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहे बेंबळा प्रकल्पाचे बहुतांश मतदारसंघातील कामे पूर्ण झाली आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाणी मिळावे त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी अजून काही प्रकल्प राबवता येईल का हा सुद्धा मानस ठेवून काम सुरू आहे आरोग्याच्या संदर्भात मतदारसंघात कुठल्याच आरोग्य केंद्रात ग्रामीण रुग्णालयात औषधीचा तुडवडा पडू नये यासाठी सतत आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहे मतदारसंघातील आरोग्य केंद्र सुसज्य व्हावे यासाठी उपाय योजना करणे पुढे गरजेचे आहे मतदारसंघात विजेचा प्रश्न गंभीर आहे याबाबत महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री यांच्याशी आपण चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत कारण शेतकऱ्यांना शेतीसाठी २४ तास विजेची गरज आहे ही बाब वरिष्ठांच्या नजरेत आणून द्यावी लागेल राळेगाव मतदार संघातील तालुक्यातील देवधरी येथे एक सुसज्ज अशी सूतगिरणी उभी करून सर्वसामान्यांच्या मुलांच्या हाताला काम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला होता . परंतु विरोधकांना बेरोजगारी वाढवायची आहे ते मताच राजकारण करतात विकासाच नाही क्रांती सुर्य बिरसा मुंडा आदिवासी सुतगिरणी च्या कामाचा शुभारंभ झाला असतांना त्यावर आक्षेप घेऊन काम थांबवीले प्रकरण न्यायप्रविष्ट आहे यात विरोधकांना काय मिळाल परंतु गोरगरीब मुलांचे परीसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले . स्वार्थी हेतूने राजकारण करणे हा माझा पिंड नाही पक्षाची ध्येय धोरणे राबविणे पक्ष आदेश पाळून काम करणे हा अजेंडा आहे . सामान्य माणसाच्या आरोग्याचे प्रश्न महत्त्वाचे समजून आरोग्य शिबिरे लावली गेली यात त्यांना बराचसा फायदा झाला आहे . येत्या काळात मतदारसंघातील सर्वच गावांना जोडणारी रस्ते मुख्य रस्ते यांची कामे पूर्ण होतील मतदारसंघातील विकासात्मक कामे पूर्ण करणे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे हे महत्त्वाचे आहे . विकासात्मक कामाला लागणारा निधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कमी पडू देणार नाही असा आपल्याला विश्वास असल्याचे आमदार प्रा डॉ . अशोक उईके यांनी बोलतांना सांगितले आहे . नवनियुक्त पदाधीकारी अँड प्रफुल चौहान जिल्हा उपाध्यक्ष, अनिल राजूरकर जिल्हा सरचिटणीस,रितेश परचाके जिल्हा सरचिटणीस ,प्रकाश भूमकाळे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज काळे ,सचिव विद्या मोहन लाड, सचिव डॉ अजाबराव डाखरे, सचिव सचिन डोरलीकर ,गजानन कैकाडे ,अजय वाके, विशाल पंढरपूरे, जयश्री मांडवकर, दिनेश गोहने , श्रीमती शीलाताई सलाम, संदीप तेलंगे, नामदेव ढोरे , राजेंद्र हारगुडे, सुभाष काकडे ,विवेक अंदुरकर ,वैष्णवी चिमूरकर ,विलास बनकर, वीरेंद्र तोडकरी ,पवन कदम ,संतोष ठाकरे या सदस्यांचाही सत्कार करण्यात आला अँड प्रफुल चौहान, अनिल राजुरकर ,प्रकाश भूमकाळे चित्तरंजन कोल्हे यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले . नवनियुक्त पदाधिकारी याच्या यथोचीत सत्कार करून सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाला तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधीकारी सर्वच बूथ प्रमुख कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते . कार्यक्रमाचे संचालन निखील राऊत यांनी तर आभार