
वणी :- झरीतालुक्यातील अडेगाव ग्राम पंचायतीची आज ता. ३१ रोजी ग्रामसभा संपन्न झाली असून या ग्राम सभेत दोन गटामध्ये चांगलीच हमरी तुमरी होऊन शाब्दिक खडाजंगी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
झरी तालुक्यातील अडेगाव ग्राम पंचायत चांगलीच मोठी ग्राम पंचायत असून या भागात काही प्रमाणात खासगी कंपन्या देखील आल्या असून अनेक कंपन्या प्रस्तावित आहे. आज या ग्राम पंचायतीचीने ग्रामसभा बोलवली असता या ग्रामसभेला गावातील असंख्य नागरिक व दोन्हीही गटातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामसभा सुरू झाली व या सभेत एका खासगी डोलोमाईड कंपनीला नाहरकत देण्याच्या मुद्द्यावरून सताधारी व विरोधामध्ये चांगलीच हमरी तुमरी होऊन शाब्दिक खडाजंगी झाली असल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी उपस्थित काही नागरिकांनी सामंजस्यपणाने वाद मिटविल्याची माहिती आहे.
जुन्या डोलोमाईड कंपन्यांना दिलेल्या शर्ती व अटींची पूर्तता न केल्याने नवीन कंपनी धारकांना नाहरकत न देण्यासाठी हा वाद निर्माण झाला असल्याची माहिती आहे.
