राळेगाव येथे विभागीय मिनी गट व्हॉलीबॉलची निवड चाचणी

सहसंपादक: रामभाऊ भोयर

महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने १४ वर्षाआतील मुलामुलींची मीनी गटाची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा वर्धा येथे १६ ते १८ फ्रेबुवारी या तारखेला होणार आहे. त्यासाठी अमरावती विभागातील संघ सहभागी होणार आहेत. विभागातील मुलांच्या व मुलींच्या संघाची निवड चाचणी राळेगाव येथील नवोदय क्रीडा मंडळ तालुका क्रीडा संकुल येथे ०४ फ्रेबुवारीला होणार आहे.
ही निवड चाचणी घेण्याची मान्यता महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे, सचिव संजय नाईक,अमरावती विभागीय सचिव संतोष गजभीये, उपाध्यक्ष मनीष जोशी व जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव अतुल नेवारे यांनी दिली आहे, स्पर्धेसाठी जाणाऱ्या मुलाच्या व मुलींच्या संघाची निवड चाचणी क्रीडा संकुल येथे होणार आहे. या ठिकाणी १४ वर्षाआतील मुलांनी सहभाग घ्यावा व सहभागी खेळाडूंनी पालकांचे संमती पत्र व वयाचा दाखला आणावा, असे आवाहन जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल संघटनेचे सहसचिव महेश भोयर, दीपक पेंदे, प्रवीण गिरी, गुरुदास नगराळे, सचीन एकोनकर,नरेश दुर्गे, प्रफुल्ल खडसे, गणेश काळे, मोणू खान, सूरज भगत, महेश राजकोल्हें ,सचिन डोंगरे, निखिल ठाकरे, सूरज उजवणे, मिथुन झाडे व मयुरी चौधरी यांनी केले आहे.