
प्रतिनिधी यवतमाळ
प्रविण जोशी
पुसद:रंगपंचमी निमित्ताने होणाऱ्या रासायनिक रंगाच्या वापरामुळे त्वचेचे विविध आजार जडतांना दिसत आहेत तसेच पर्यावरणाला हानी पोहचत आहे यावर प्रतिबंध घालण्याचा व पर्यावरणपूरक रंगोउत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने पुसद तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा हर्षी येथील विद्यार्थींनी परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या पळसाच्या फुलांचा वापर करून नैसर्गिक रंग तयार केला.
याबरोबरच नैसर्गिक रंग बनवण्याचे इतर घटक यावर चर्चा घडवून आणली गेली.नाशिक येथील राष्ट्रीय नवोपक्रम पारितोषिकप्राप्त शिक्षक नितीन केवटे यांनी आपल्या ‘रविवारचा विरंगुळा’ या उपक्रमाअंतर्गत ‘शाळेतील भौतिक व गुणवत्तापूर्ण विकासात विद्यार्थ्यांची भूमिका’ यावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थीनींना पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्याची प्रतिज्ञा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पुसद येथील ERC विषय मित्र देव यांनी दिली.यावेळी शाळेतील मुख्याध्यापक इंगोले अधिक्षक दिलीप दामोधर दृढर यांचे सहकार्य लाभले.
