वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची क्रांतीज्योत पालखीचे मानवता मंदिरयेथे आगमन

वंदनीय राष्ट्रसंत.तुकडोजी महाराज यांनी 9 ऑगस्ट 1942 साली जो ब्रिटिश सरकारला लढा दिला होता तो. आजही कायम आहे या अनुषंगाने क्रांतीज्योत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी यावली चिमूर बेनोडा आष्टी येथे 9 ऑगस्ट 1942 साली वंदनीय भारतनिष्ठ सरकारला चेतावणी दिली होती त्याचे पालन करून आज गुरुदेव प्रेमी महाराजांची कर्मभूमी मोझरी ( गुरुकुंज ) येथून 9 ऑगस्ट 2024 ला. क्रांतीज्योत पालखी चा प्रारंभ झाला व क्रांतीज्योत यात्रेची पालखी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.चे जन्मस्थान यावली ( शहीद ) येथे दाखल झाली व तेथून 10 ऑगस्ट 2024 ला प्रस्थान करून क्रांतीज्योत पालखी यात्रा विदर्भाच्या दौऱ्याकरता निघाली ह्या क्रांतीज्योत पालखी पूर्ण विदर्भाचा प्रवास करून 31 ऑगस्ट 2024 ला मोझरी गुरुकुंज येथे समाप्त होईल गुरुकुंज मधील प्रचारक विभागाचे प्रचार प्रमुख ह. भ. प. श्री प्रकाश महाराज वाघ हे गुरुकुंज मध्ये 9 ऑगस्ट ला क्रांती ज्योत पालखी यात्रेचा पारंभ झाला त्यावेळेस बोलत होते. ही क्रांतीज्योत पालखी यात्रा नागपूर जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि विदर्भातले उर्वरित जिल्हे असा ह्या क्रांतीज्योत पालखी यात्रेचा दौरा नऊ ऑगस्ट ला सुरू झाला क्रांतीज्योत पालखीचा दौरा चालू असताना आज रोजी यवतमाळ जिल्ह्यात मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी यवतमाळ. येथे आज सायंकाळी सहा वाजता पालखीचे आगमन झाले क्रांतीज्योत पालखीचे आगमन झाल्यानंतर मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी येथे सायंकाळी दैनंदिन प्रमाणे सामुदायिक प्रार्थना. झाली प्रार्थना सुरू व्हायच्या आधी प्रास्ताविक ग्रामगीताचार्य प्राध्यापक श्री कंठाळे सर यांनी केले आणि प्रार्थनेचे सूत्रसंचालन मानवता मंदिर भजन प्रभाव समितीचे सचिव श्री रामदासजी घंगाळे यांनी केले . प्रार्थनेमध्ये हार्मोनियमची साथ जय चव्हाण आणि तबल्याची साथ राजेंद्र गाडगे यांनी केली प्रार्थनेचे. महत्त्वावर नागपूर जिल्ह्याचे सेवा अधिकारी श्री सावरकर गुरुजी यांनी चिंतन व्यक्त केले या क्रांतीज्योत पालखी यात्रेच्या दर्शनाला व सामुदायिक प्रार्थना ला गुरुकुंज मधील पालखीची क्रांतीज्योत यात्रा घेऊन निघालेले गुरुदेव प्रेमी श्री चरडे गुरुजी जीवन प्रचारक श्री सुनील बुरडे पालखी व्यवस्थापक श्री सावरकर गुरुजी नागपूर जिल्हा सेवा अधिकारी श्री गावातत्रेजी जीवन प्रचारक तसेच वाहन चालक श्री बन्सीलाल जी आणि मानवता छत्रालय गुरुकुंज मधील विद्यार्थी तसेच मानवता मंदिर चे अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश जयस्वाल श्री विजय इंगोले कंटाळे सर खुशाल ठाकरे तुकाराम जी राऊत रामदासजी घंगाळे नामदेवराव राजूरकर बजरंग शेंडे संजय भुयार आणि राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख व मानवता मंदिर ज्या कार्यकर्त्यांनी गुरुकुंज मोझरी येथून. क्रांतीज्योत पालखी घेऊन आलेले सर्व मान्यवरांचे. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामधील सर्व गुरुदेव प्रेमी व महिला मंडळींनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या क्रांतीज्योत पालखीचे दर्शन घेतले त्यानंतर वंदनीय महाराजांची आरती करण्यात आली त्यानंतर राष्ट्र वंदना घेण्यात आली व शेवटी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा त्रिवार जयघोष घेऊन या क्रांतीज्योत पालखी यात्रेचा समारोह करण्यात आला