
सहसंपादक : रामभाऊ भोयर
रुग्णांच्या नातेवाईकांच्या विनंतीवरून रुग्णालयात जावून रुग्णाच्या तब्येती संदर्भात डॉक्टरांशी चर्चा करतांना सभ्य वर्तवणुक ठेवून सुध्दा पुन्हा कोणताही राजकीय पदाधिकारी शासकीय रुग्णालयात कोणत्याही रुग्णाच्या मदतीसाठी आला नाही पाहिजे या हेतूने मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची मागणी मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
राजकीय व सामाजिक जीवन जगत असताना समाजातील तळागाळातील अनेक लोकांसोबत संबंध येतो सर्वसामान्य जनतेची कामे विनाअडथळा व्हावी या साठी प्रयत्न केले जातात, परंतु हे करत असताना नुकताच एक वाईट अनुभव स्व. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय येथे आला. मनसेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार हे काही पदाधिकाऱ्यांसह त्यांना एका रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन आल्याने तेथे पोहचले असता संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना विनंती केली कि रुग्णाला अतिदक्षता विभागाची गरज आहे त्यामुळे त्यांना बाहेर काढू नये. परंतू त्या नंतर तेथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली व वैद्यकीय महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरांनी त्यांच्या संघटने मार्फत संप पुकारला व शिकाऊ डॉक्टरांना धमकी दिली असा खोटा आरोप करून देवा शिवरामवार व इतर यांच्या वर खोट्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, वास्तविक पाहता कोणतीही शहानिशा न करता अशा प्रकारे राजकीय पदाधिकारी असो किंवा समाजसेवक तर इतर कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारे गुन्हा नोंद करने अपेक्षितच नाही. अशाने कोणताही राजकीय पदाधिकारी सार्वजनिक ठिकाणी लोकांची मदत करण्यासाठी धजावणार नाही, त्यामुळे गुन्हाची नोंद वापस घेण्यात यावे अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुकाध्यक्ष सुरज लेनगुरे, वाहतुक ता. स्वप्नील नेहारे, सचीन आत्राम, रोशन गुरुनुले यांच्या सह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
