
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विध्यार्थ्यांना पुढील आयुष्यात विविध स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्तता व सामान्यज्ञानाची शिदोरी प्राप्त करून देणारा महादीप हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या दृष्टीने विध्यार्थी -विध्यार्थिनीं भविष्यात निश्चितच विविध क्षेत्रात नाव लौकिक प्राप्त करतील असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने यांनी केले.कन्या शाळा राळेगाव येथे आयोजित महादीप स्पर्धा केंद्राला त्यांनी भेट दिली.वर्गाची पाहणी केली व शिक्षकांशी संवाद साधला. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी निलेश दाभाडे यांनी वर्गरचना, नियमानुसार आयोजन या बाबत केंद्राने केलेल्या आयोजनाचे कौतुक केले.
राळेगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या जि. प.च्या विविध शाळेतील वर्ग पाच ते आठ च्या 85 विध्यार्थी-विध्यार्थिनीं यांनी आज ( दी. 9 ऑक्टो.) महादीप परीक्षा दिली. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांकरीता महादीप परीक्षा हा स्तुत्य उपक्रम जि. प. शाळे अंतर्गत राबविण्यात येतं आहे.
या वेळी केंद्रप्रमुख डॉ.कल्पना डवले, शाळेचे मुख्याध्यापक महेश सोनेकर,
केंद्रस्तरीय विशेष शिक्षक राहुल पोटरकर,
मुख्याध्यापक महेश सोनेकर, शिक्षक नितीन ढोबाळे,प्रताप ओंकार, हरीश मांडवकर, अनिता गुगुळकर, स्वाती वरघने, पुष्पा गेडाम, मिता नानवटकर, अर्चना सुरजुसे, राजश्री जावळकर, माधुरी होले आदींनी आयोजना बाबत परिश्रम घेतले.
