नगरपंचायतच्या आश्वासनानंतर जॉन्टी उर्फ प्रशांत विणकरे यांच्या आत्मदहन आंदोलनाला तूर्तास स्थगिती


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


ढाणकी शहरातील झालेल्या अनेक प्रभागातील कामापैकी एक असलेले प्रभाग क्रमांक ३ मधील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या झालेल्या कामाबद्दल शहरवासी यांची व जनसामान्यांची नाराजी होती. तसेच काही दिवसापूर्वी अवकाळी पाऊस पडला त्यामुळे तो सिमेंट रस्ता वाहून गेला यावरून झालेल्या रस्ता किती सुमार दर्जाचा असेल हे सांगावयाची गरज नाही या पालथ्या घागरीवर ज्याप्रमाणे पाणी घालून काहीच फायदा होत नाही तशा प्रकारचा हा रस्ता बनल्यामुळे सदर क्रमांक ३ मधील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये नालीचे रोगराईला आमंत्रण देणारे घाण सांडपाणी सुद्धा गेल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. या जनतेच्या अडचणीची न्याय देण्यासाठी व झालेले आणि नीकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई व्हावी यासाठी वंचित बहुजन महासंघाचे जिल्हा महासचिव जॉन्टी उर्फ प्रशांत विणकरे यांनी ढाणकी नगरपंचायत प्रशासनाला दिनांक ६ जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

त्यावर नगरपंचायत प्रशासनाने आंदोलनाची भविष्यातील तीव्रता ओळखून जॉन्टी उर्फ प्रशांत विणकरे यांना नगरपंचायत प्रशासनाला सहकार्य करण्याचे पत्र दिले होते व पोलीस विभागानेही खबरदारीचा उपाय म्हणून नोटीस बजावली होती पण यानंतर सुद्धा आंदोलन करते जॉन्टी उर्फ प्रशांत विणकरे आंदोलनावर ठाम राहिले व बसस्थानक परिसरातील दूरध्वनीच्या उंच असलेल्या टॉवर वर चढून जात ११ वाजता आंदोलनाला सुरुवात केली बघता बघता बघ्याची तोबा गर्दी जमली होती. यावेळी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडालेली बघायला मिळाली त्याला अनुसरून या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चौख बंदोबस्त ठेवला होता आंदोलन करते व नगरपंचायत विभागाचे अभियंते संदीप वानखेडे यांच्याशी सकारार्थी चर्चा घडवून आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. झालेल्या कामाची चौकशी होणे गरजेचे असून हा पैसा सर्व सामान्यांचा असून आंदोलन करणे गरजेचे होते असे बोलकी चर्चा प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांची होती आंदोलनाची तीव्रता बघून बिटरगाव(बू) चे ठाणेदार प्रताप भोस व पो. ऊ.नी. कपिल मस्के मोहन चाटे, निलेश भालेराव यासह नगरपंचायत विभागाचे कर्मचारी संदीप वानखेडे व राजू दवणे यावेळी उपस्थिती होते