कोळी येथील असंख्य युवा कार्यकर्त्याचा शिवसेना पक्षात प्रवेश

प्रतिनिधी: कृष्णा चौतमाल,हदगाव

कोळी – कोळी हे गाव मनाठा सर्कल मधील मोठ्या गावांपैकी एक आहे जिल्हा परिषदेचा सदस्य होण्यासाठी या गावाच्या मतदाराची साथ असणे गरजेचे असते. कोळी हे गावफार पूर्वीपासून शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला असून मागची विधानसभा निवडणूक वगळता या गावाने कायम शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो.
शिवसेनेचे माजी आमदार तसेच जिल्हाप्रमुख असलेले नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात खूप विकास कामे या गावात केली. आता लवकरच होणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ते कामाला लागले असून कोळी गावातील असंख्य युवकांचा काल हदगाव शिवसेना संपर्क कार्यालय येथे हदगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी उपस्थित माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर , युवा सेना तालुका प्रमुख अमोल पाटील ,युवासेना उपतालुका प्रमुख प्रवीण जगताप , युवासेना ता. समन्वयक स्वप्निल पाटिल , कोळी गावचे मा. उपसरपंच गजानन जगताप , शालेय शिक्षण समितीचे सदस्य रामदास पाटिल क्षिरसागर , युवा सेना सर्कलप्रमुख आशिष भुजबळ , शिवसेना शाखाप्रमुख बालाजी चौतमाल, युवा सेना शाखाप्रमुख संदीप जगताप , शो मी समन्वयक अक्षय धांडे व युवासैनिक शिवसैनिक उपस्थित होते.