उर्जा मंत्री ना. राऊत यांची घेतली किरण कुमरे यांनी भेट .

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

महाराष्ट्रात अचानक विज वितरण कंपनीने पंपावर विज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावत असल्याने व पंपाच्या विजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले हंगामातील रब्बी पिके आपल्या तोंडातून हिरावुन घेणार असल्याचे निदर्शनास आल्याने राळेगाव तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल भाऊ मानकर, जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल अरविंद वाढोणकर, कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अरविंद फुटाने,माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पुरूषोत्तम निमरड, राळेगाव खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले, यवतमाळ जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस किरण कुमरे, रावेरीचे सरपंच राजेंद्र तेलंगे, रावेरी येथील प्रगतिशील शेतकरी माधवराव चौधरी, पिंपरी दुर्ग येथील युवा शेतकरी कुणाल इंगोले व समस्त शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीच्या राळेगाव येथील कार्यालयात विज पुरवठा खंडित न करण्याबाबत निवेदन दिले. व येथील कार्यालयात दिलेल्या निवेदनाची दुय्यम प्रत घेऊन यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी सरचिटणीस किरण कुमरे व दशरथ मडावी यांनी मुंबई गाठून शेतकरी बांधवांच्या समस्या कथन करून उर्जा मंत्री नामदार नितीन राऊत यांना निवेदन दिले सोबतच कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा लोकनेते नानाभाऊ पटोले यांच्याशी चर्चा करून याबाबत विचार व्हावा अशी विनंती केली असता शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार करून व कॉंग्रेस पक्ष हा शेतकरी हिताचा असल्याचे निदर्शनास आणून ताबडतोब तीन महिन्यांपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्यांचा विज पुरवठा खंडित न करण्याबाबत संबंधित कार्यालयांना आदेश दिल्याने सर्वत्र शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला असून केलेल्या कार्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले असून किरण कुमरे व दशरथ मडावी यांच्या कार्याची सगळीकडे वाहवा होत आहे.