
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कीन्ही जवादे येथील महिला सक्षमीकरण करण्यासाठी शिवनकला प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले . ऐक महीनाभर हे प्रशिक्षण चालणार आहे. यापुर्वी असे प्रशिक्षण शिबीर घेउन ४० महीलांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास समिती मार्फत ७५% अनुदानावर शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आली.या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन सरपंच सुधीर पाटील जवादे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कल्पनाताई वाडगुरे , दुर्गाबाई वडते,मालाताई लोणबले, प्रियंका उईके, ग्रामपंचायत उपसरपंच रमेश तलांडे,सदस्य प्रसाद निकुरे , प्रतिभा मोहर्ले,सिमा उईके, सुषमा जवादे,सचिव राजु निवल,राजुभाउ मोहुर्ले किशोर गमे, पवन खैरकार, आत्माराम गानफाडे, नरेश ठाकरे, पुंडलिक लोणबले, मारुती विठाळे,व नागरिकांचे सहकार्य केले.१७/५/२०२५
