ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन,चंद्रपूर तर्फे विशाल शेंडे यांचा सत्कार

राजुरा: ग्राम आरोग्य सेना फाऊंडेशन, चंद्रपूर द्वारा भव्य शैक्षणिक, सामाजिक तथा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पदवीप्राप्त विद्यार्थी गौरव समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून निश्चयाप्रमाणे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. आणि त्यांची शैक्षणिक तळमळ समाजोपयोगी व्हावी याकरिता पदवी दीक्षांत ड्रेसकोड देऊन 30 पदवीधर विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी वरुर रोड येथील विशाल शेंडे यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मा. दिलीप सोळंकी यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून मी कसा घडलो! आणि कोणत्याही विद्यार्थ्याने परिस्थितीचा बाऊ करत बसू नका, सातत्य ठेवा, यश आपलेच आहेत असे डॉ. प्रवीण येरमे यांनी पाटण येथील ग्रामस्थ व पदवीधर विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. शांतारामजी उईके , प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री दिलीप सोळुंके, प्रा. विठ्ठल अत्राम होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधाकर मडावी यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजन ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. प्रवीण येरमे, एम.बी.बी. एस. एस.डी.सी.आय.सी.यू.पी.जी.डी.एस. यांनी केले.