
सहसंपादक : रामभाऊ भोयर
केंद्र शासनाचा अॅग्रीस्टेक हा
महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम आहे. यामध्ये शेतकरी माहिती संच तयार केला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट असा शेतकरी क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येत आहे. या विशिष्ट ओळखपत्राच्या आधारे भविष्यात कृषीविषयक सर्व व्यवहार व योजना पार पडणार आहेत. यासाठी सदर ओळखपत्र क्रमांक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असला तरी नोंदणीसाठीचे संकेतस्थळच सुरळीत चालत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
‘अॅग्रीस्टेक’ अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी अत्यंत महत्त्वाची असल्याने जिल्हाधिकारी स्तरावरून महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांना गावोगावी जाऊन सर्व
शेतकऱ्यांची नोंदणी कशी करता येईल यासाठी सूचना दिल्या आहेत. परंतु, राळेगाव तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे फार्मर आय डी काढणे अद्यापही बाकी आहे त्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांकडून नोंदणी करण्यासाठीची गावागावात शिबिरे घेण्याची आवश्यकता आहे .
दिवसांपासून वारंवार पोर्टल सुरळीत चालत नसल्याने दिवसभरात दहा शेतकऱ्यांची देखील फार्मर आयडी काढण्यासाठी नोंदणी पूर्ण होणे अवघड जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी नोंदणी करण्यासाठी येतात. परंतु रिकाम्या हातीच त्यांना परत जावे लागते
सीएससी केंद्रचालक
अॅग्रीस्टेक या उपक्रमांतर्गत शेतकरी फार्मर आयडी काढणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत असल्याने तीन दिवसांपासून आम्ही हा फार्मर आयडी काढण्यासाठी सीएससी केंद्रावर जात आहोत. परंतु, त्या ठिकाणची वेबसाईट चालत नसल्याने नोंदणी पूर्ण होत नाही.
