जातीपातीच्या पलीकडे असलेला उमेदवार – अशोक मेश्राम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

अशोक मारुती मेश्राम 77, राळेगाव विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवडणूकी मध्ये उभा आहे.आजचे राजकारण जाती धर्मातील फुट पाडुन निवडुन येणे या पुरतेच मर्यादित आहे, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी आम्ही जाती पातीचे राजकारण सोडले नाही,मला हे राजकारण बदलायचे आहे,मी सर्व समावेशक राजकारणाचा पुरस्कर्ता आहे.माझा दृष्टिकोन गोरगरीब, शेतकरी, छोटे व्यापारी सर्व सुखी झाले पाहिजे व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
राळेगाव,कळंब व बाभुळगाव शहरात छोटे व्यापारी अतिक्रमण जागेवर व्यवसाय करतात व आपले पोट भरतात पण त्यांना वारंवार प्रशासनाचा खूप त्रास होतो अशा लोकांना कायमस्वरूपी पट्टे त्यांचे नावे करून देण्याची योजना मी आखली आहे, पार्किंग समस्या फार मोठी आहे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढेन.संविधानाची पायमल्ली होतांना दिसते त्यासाठी जातीपातीच्या राजकारणा पलीकडे विकासाच्या मुद्यावर मी सतत लढत राहिन व गोरगरीब जनतेसाठी मतदारसंघात चोवीस तास उपलब्ध राहुन त्यांची सेवा अव्याहतपणे करत राहिन.म्हणुन ज्यांनी या आजी -माजी आमदारांची कारकीर्द बघितली असेल त्यांनी एकदा मला संधी द्यावी, चेहरा नवा बदल हवा या संधीचा फायदा मतदार राजांनी करावा असे मी आवाहन करतो.