
वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वडकी खैरी रोडवर शनिमंदिर जवळ टाटा एस व दुचाकीची समोरासमोरील झालेल्या धडकेत दोन्ही चालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिं. १७ एप्रिल २०२५ रोज गुरुवार ४:३० वाजताच्या दरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे की या झालेल्या घटनेत टाटा एस क्रमांक एम एच ३२ ए जे २०२८ ने प्रवीण ढोकपांडे हा खैरी कडून वडकी कडे येत होता तर प्रशांत येलेकार हा क्रमांक एम एच ३४ ए ई १६५७ या क्रमांकाच्या दुचाकीने वडकी कडून वरोऱ्याकडे जात असताना वडकी खैरी रोडवरील शनी मंदिराजवळ टाटा एस व दुचाकी ची समोरासमोर जब्बर धडक बसून या धडकेत दुचाकी चालक व टाटाएस चालक हे दोनही गंभीर जखमी झाले असून या घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनला कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दुचाकी चालक प्रशांत येलेकर राहणार वरोरा तर टाटाएस चालक प्रवीण ढोकपांडे राहणार हिंगणघाट या दोघांनाही वडनेर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. घटनास्थळी बीट जमादार अविनाश चीकराम यांनी भेट देऊन दोन्ही वाहनाचा पंचनामा करून अपघातातील दुचाकी व टाटाएस ही वाहने पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली असून पुढील तपास वडकी करीत आहे.
