चढ्या दराने विक्री करणाऱ्या दोषी कृषी केंद्र चालकांवर कारवाई करा, अन्यथा मनसे आंदोलन छेडणार,कृषी विभागाला दिली २६ जुन पर्यंत ची डेडलाइन


मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी दिले निवेदन


सहसंपादक: रामभाऊ भोयर


बोगस, प्रतिबंधित बियाणे, रासायनिक खते चढ्या दराने विकुन शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर २६ जुन पुर्वी कारवाई न झाल्यास येत्या २७ जुन पासुन मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा ईशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी तहसीलदार राळेगाव तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
राळेगाव तालुक्यात परवानगी नसलेले प्रतिबंधित बियाणे, रासायनिक खते चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणुक केल्या जात असतांना कृषी विभागाने यांवर कारवाई करण्यासाठी मनसेने निवेदन दिले होते परंतु कारवाई न झाल्याने मनसेच्या वतीने पुन्हा स्मरणपत्र निवेदन देण्यात आले यामध्ये कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य मागण्यांसाठी वारंवार पत्रव्यवहार, निवेदने आणि आंदोलने करावी लागत असेल तर ही बाब अत्यंत दुःखद आहे.. दिनांक १२ जून २०२३ रोजी उपरोक्त आज या निवेदनास आठवडा उलटला तरी ही कृषी विभागाकडून यावर कुठलीही करवाई झालेली नाही त्यामुळे या स्मरणपत्रा व्दारे पुन्हा एकदा ही बाब निदर्शनास आणून देण्यात येत आहे की येत्या २६ जुन पुर्वी कारवाई न केल्या गेल्यास २७ जुन पासुन मनसे स्टाईल ने आंदोलन छेडण्याचा ईशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी दिला यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष सुरज लेनगुरे, शेतकरी ता. अध्यक्ष संदीप कुटे, स्वप्निल नेहारे, उमेश पेन्दोर, रोशन गुरूनुले, सचिन आत्राम, सागर ठाकरे, आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.