सुनिता लुटे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित,विद्यार्थ्यांना भाषा कौशल्य व अध्ययनाच्या कार्याचा गौरव


ढाणकी -प्रतिनिधी : प्रवीण जोशी


ढाणकी जि.प.प्राथमिक शाळेत आपल्या शिक्षकी पेशाची सुरूवात करणाऱ्या श्रीमती सुनिता बाळूजी लुटे या बंदिभागातील सोनदाभी सारख्या गावाच्या बंदिभागातील रहिवासी असलेल्या व सध्या कुरळीच्या प्रकल्पग्रस्त भोजनगर तांडा क्र.2 येथे कार्यरत प्राथमिक शिक्षिका केवळ एक शिक्षकी शाळेवर असुनही बंजाराबहूल विद्यार्थ्यांना भाषा कौशल्य व अध्ययन करून त्यांना शाळेचा पट वाढविण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला.
यावर्षी दि.07 सप्टेंबर गो.सी.गावंडे महाविद्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.विभागाचे आमदार नामदेवराव ससाणे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून त्याना गौरविण्यात आले.यावेळी त्यांचे वडील बाळूजी लुटे व आई सौ.सरस्वती देखील हया सत्कार सोहळयाला उपस्थित होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे, होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार नामदेवराव ससाने , गटशीक्षणधिकारी सतिश दर्षनवाड, विठ्ठलराव सुर्यवंषी , विस्तार अधिकारी (शीक्षण) पंाडूरंग खांडरे ,केंद्रप्रमुख संतोष घुगे,श्री.भारत भंबरवाड,अनिल बोंपीनवार,ज्ञानेश्र्वर गायकवाड,रामदास केंद्रे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार ससाने यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला तद्वतच त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण सभागृहामध्ये आवाज उठवू असे आश्वासन दिले.श्री वानखेडे व इतर मान्यवरांनी सुध्दा यावेळी विचार व्यक्त केले.
श्रीमती सुनिता लुटे यांनी भोजनगर तांडा येथे कार्यरत असतांना मुख्यालयी राहुन खासकरून विद्यार्थ्यांना मराठी भाषा व लिखाण करण्यास शिकवण्यासाठी विषेश वर्ग घेतले.वृक्षारोपण,कोविड काळात प्रत्येक घरी जावून आरोग्यविशयक जनजागृती केली. विद्यार्थ्याच्या आरोग्याकडे सुध्दा वैयक्तीक लक्ष केंद्रीत करूण काविळग्रस्त विद्यार्थिनीला चांगल्या उपचार करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी पाठविले.सदर विद्यार्थीनीचे आई वडील पूण्यासारख्या ठिकाणी राहत असल्यामुळे उपचारास विलंब होवू नये म्हणून तिच्या नातेवाईकाला आजाराचे गांभीर्य लक्षात आणून दिले.विशेष म्हणजे एकाच शिक्षीकेवर 50 ते 60 विद्यार्थ्यांचा भार असतांना त्यांनी पोशण आहारातून संतुलीत आहार देण्याचा प्रयत्न केला.स्वनिर्मिती शैक्षणिक साहित्याच्या वापर व विद्यार्थी केंद्रीत अध्ययन यावर त्यांचा भर असतो. हे त्यांचे विद्यार्थी गळतीचे प्रमाण सुध्दा नाही.जास्तीत जास्त विद्यार्थी शाळेत उपस्थित रहावे म्हणून त्यांचा गृहभेटीवर भर असतो.
त्यांच्या या यषाबद्दल सोनदाभी येथील गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले असून त्यांच्या गावाचे नाव रोशन केल्याबद्दल सुनिता लुटे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.सोनदाभीचे रहिवासी भगवान दळवी (माजी मुख्याध्यापक),श्रीमती संध्यारजनी बहादे, उल्हास बहादे,पंचषीला दिपक वाघमारे,श्रीमती पालेखवाड,जवळेकर मॅडम,इरनलवाड मॅडम,वानखेडे मॅडम,श्रीरामे मॅडम,मारोती लुटे,संजय लुटे,संतोश दळवी,यांनी भावी आयुष्यासाठी व उचित कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती माधुरी बोकडे तर आभार विनोद भार साकळे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष माळवे,संतोश कांबळे, बाळासाहेब सरसमकर व बी.आर.सी.च्या कर्मचाऱ्याने प्रयत्न केले.