
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य व पोळा सणाचे औचित्य साधून तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील गुजरी येथे दिं २५ ऑगस्ट २०२२ रोज शुक्रवारला पशु पक्षी व जनावरांची मोफत तपासणी तथा औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या पशु पक्षी तपासणी व औषधोपचार शिबिराचे उदघाटन डॉ रविंद्र कानडजे तहसीलदार मा.केशवराव पवार गटविकास अधिकारी राळेगाव यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यकमाचे अध्यक्षा विजया विठ्ठलराव बोबडे सरपंच ग्रामपंचायत गुजरी ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भूपेंद्र कारीया, सैय्यद युसूफअल्ली,चांदेमामा,भिकचंद वर्मा,होते या शिबिराकरिता
डॉ.आर. ए. नाळे पशुवैद्यकीय अधिकारी राळेगाव डॉ झाडे साहेब पशुधन विकास अधिकारी डॉ काळमेघ पशुधन विकास अधिकारी डॉ सचिन मेश्राम पशुधन पर्यवेक्षक डॉ नवरे पशुधन पर्यवेक्षक यांच्या मुख्य उपस्थितीत त्यांचे चंमु नी पशु पक्षी, जनावरांचे आरोग्य तपासणी केली असून पशुपक्षी व जनावरांच्या आरोग्य तपासणी शिबिरात १) तपासणी व औषधोपचार २) गर्भ तपासणी ३)वंध्यत्व तपासणी ४) खच्चीकरण ५)शस्त्रक्रिया ६)कृत्रिम रेतन सदर बाबी ची तपासणी शिबिरा मध्ये एकुण ९० बैल, गायी जनावराची तपासणी करण्यात आली व ८५ बकऱ्याची तपासणी करण्यात आली ४ कोंबड्या ची तपासणी करुन औषध उपचार करण्यात आले असून जनावरे पाळण करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.सदर शिबीर तलाठी विनोद अक्कलवार,व माजी पोलीस पाटील गंगाधर घोटेकार तलाठी सौरव तुमस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले असून या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिरा करीता थाँमस पेंदाम , मनिष खेडेकर, नयन कोकाटे, रुपेश मेश्राम, कांतेश्वर शेंडे, समिर जुमनाके, रविंद्र हुलके, अखील धांदे ग्रा.पं. सदस्य प्रकाश बेताल, ग्रा.प. सदस्य, माधुरी कोवे ग्रा. प. सदस्य, कल्पना दाभेकर,ग्रा.प.सदस्य, प्रगती झोड ग्रा.प. सदस्य मुख्याध्यापक मनिष काळे सर, व शिक्षक वृन्द, विवेक गोंडे, अशोक सावरकर, प्रदिप लोंढे, भगवान दांदडे, लक्ष्मण धांदे, मधुकर घोटेकर, पुरुषोत्तम शिरपुरकर, भाऊराव वराडे, जिवन दाभेकर, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजया पाटिल ग्राम सेवक गुजरी यांनी आभार प्रदर्शन केले.
