
खासगी जागेवर मेडिकल कॉलेज न घेता शासकिय जागेवरच हिंगणघाट शहरालगत कॉलेज घेण्याची होती मागणी
मल कन्स्ट्रक्टशने जागा दान देण्याच्या प्रस्ताव मागे घेतल्याने राष्ट्रवादीचा १५ जुलैचा जन आक्रोश मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे…
हिंगणघाट:- हिंगणघाट शहरात मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मल कन्स्ट्रक्टशने जागा दान देण्याच्या प्रस्ताव मागे घेतल्याने १५ जुलैचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन आक्रोश मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे.
मल कन्स्ट्रक्टशने ४० एकर जागा दान देण्याचा प्रस्ताव दिला होता. जिल्हाधिकारी यांनी तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला नंतर सगळी कडे यांचा विरोध झाला.शहरात प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पत्रकार परिषद घेऊन होणारे वैद्यकीय महाविकास शासकीय जागेवरच व्हावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १५ जुलै ला हजारो लोकांचा जन आक्रोश मोर्चा काढेल असा ईशारा दिला होता.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालयांचा विधानसभेत चार वेळा मुद्दा मांडला, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला.प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वर्धा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शहरातील शासकीय जागेवरच वैद्यकीय महाविद्यालय शहरात व्हावे असे निवेदन सुद्धा होते.परंतु मल कन्स्ट्रक्टशने चाळीस एकर जागा दान देण्याचा प्रस्ताव मागे घेतल्याने १५ जुलैला होणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन आक्रोश मोर्चा पुढे घेण्यात येईल असे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सांगितले….
