कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव च्या वतीने जागतीक आदिवासीं दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होेते.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

रानभाज्यांमधील जीवनसत्वे व प्रथिनांबद्दल नागरिकांना व युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे या आरोग्यदायी भाज्या आजच्या युवा पिढीच्या आहारातून दुरावलेल्या आहे. हे हेरून कृषी विभागाने राळेगाव येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव च्या वतीने जागतीक आदिवासीं दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होेते.
सदर महोत्सवाचे उ्घाटन श्री प्रशांत भाऊ तायडे सभापती पंचायत समिती राळेगाव, तहसीलदार डॉ.श्री रवींद्र कानडजे तालुका कृषी अधिकारी कू मनीषा गवळी , व तसेच मंडळ कृषी अधिकारी राळेगाव राजु ताकसांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कंदमूळ, फुलेे, पानांच्या स्वरूपातील या भाज्या पावसाळ्याच्या सुरवातीला जंगलात आढळून येतात. रानभाज्यांच्या संवर्धनातून रानभाज्यांतून मिळणाऱ्या जीवनसत्वे व प्रथिनातून राज्यातील नागरिकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी केल्या जाऊ शकते. अनेक रानभाज्यात तर शरीराला पोषक असे औषधी गुणधर्म आहेत. पावसाळ्यात वेलीवर लागणारे कर्टुली ही रानभाजी गर्भवती आणी लहान बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. इत्यादी माहिती शेतकरी श्री राजुमोहूर्ले व कृषीविभागातील कर्मचारी यांनी पाहुण्यांना व उपस्थित शेतकऱ्यांना दिली. या महोत्सवात 33 प्रकारच्या रानभाज्या, पालेभाज्या , फळवर्गिय भाज्या व कंद वर्गीय भाजी समाविष्ट होते सदर महोत्सवात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी भेट देवून रानभाज्या चे महत्व जाणून घेतले.. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी खालील कृषि सहाय्यकानी परिश्रम घेतले. श्री पचारे, श्री धुमाळे, श्री वाघमारे ,श्री मासाळ, श्री भुरके,श्री सचिन आत्राम, श्री प्रकाश मेश्राम मुळाटे, तुषार मेश्राम, श्री एम्बडवार, सौ ताकसांडे, कू येरमा, चीप्पावार, कू भोयर, कू राव व मोठया संकेत शेतकरी उपस्थित होते… सदर कार्यक्रमाचे आभार बीटीयम श्री गायकवाड यांनी मानून सदर महोत्सवाची सांगता केली.