
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक टी झेड माथनकर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संचालन आर एस वाघमारे यांनी तर आभारप्रदर्शन पि पि आसुटकर यांनी केले. उपस्थित मुख्याध्यापक तथा शिक्षक व विद्यार्थी राणू वाढई, नम्रता शेंडे, प्राची मुनेश्र्वर यांची भाषणे झाली. त्यानंतर भिमगिते ऐकवण्यात आली. कार्यक्रमाला वी. एन. लोडे बि बी कामडी वी. टी दुमोरे एस एम बावणे एस वाय भोयर तथा सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
