ग्रामपंचायत सदस्याला शिपायाकडून व शिपायाच्या मुलाकडून मारहाण

वणी तालुक्यांतील कुंभारखणी( इजासन) गट ग्रामपंचायतमध्ये शासनाकडून आलेल्या विविध योजनांची माहिती लोकांना देण्यासाठी व लोकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी एकट्याइजासन गावासाठी 3 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजता ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती तर 2 ऑक्टोंबर रोजी फक्तं कुंभारखणी येथे ग्रामपंचायतीचे कार्यालयं असल्याने तेथें कुंभारखणी गावात ग्रामसभा आयोजीत केली होती

त्यामुळे दुसऱ्या दिवशी इजासन येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा ग्रामसभा सुरू असतानाच कुंभारखणी (इजासन) गट ग्रामपंचायत कार्यालयात सदस्य असलेल्या संकेत काशिनाथ मोहिते(27) यांनी ग्रामसेवकांला 2010 सालचे गावनमुना 8 अ रजिस्टर मागितले त्यावेळी ग्रामसेकाने रजिस्टर विषयी माहिती न देता शिपाई देवराव चेंडकू मडावी (55) रजिस्टर विषयी माहिती सांगून संकेत काशिनाथ मोहिते या सदस्याशी मोठ्यामोठ्या हुज्जत घालून बोलू लागला व त्यांनतर सदस्याच्या अंगावर मारण्यासाठी शिपायाचा मुलगा सुनिल देवराव मडावी (26) व ग्रामपंचायत शिपाई असलेला देवराव चेंडकु मडावी (55) धावून गेला आणि दोघाही बापलेकांनी अश्चील जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली

तेव्हांच कुंभारखणी ग्रामपंचायतला ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेल्या प्रितम बागडे यांनीही आजच्या सभेचे रजिस्टर कूठे आहे असे शिपायाला विचारले असता ते फाटून गेलं अश्या पद्धतीने ग्रामसेवकांला शिपायाने उद्धटपणे उत्तर दिले

व ग्रामपंचायत सदस्य असलेल्या संकेत काशिनाथ मोहिते यांना ग्रामपंचायत शिपाई असलेल्या देवराव चेंडकु मडावी(55 ) व सुनिल देवराव मडावी (26) या दोघा बापलेकांनी जिवे ठार मारण्याची सुध्दा धमकी दिली तेव्हाच ग्रामसभेला हजर असलेल्या ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये जावून रितसर तक्रार दाखल केली तेव्हा त्या तक्रारी वरून दोघा बापलेका विरुद्ध कलम 323.427.504.506.आणि 34 ही कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे