

पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आला मागर्दशन कार्यक्रम विद्यार्थी-पालकांनी हजारोंच्या संख्येने केली गर्दी
फुलसावंगी हा परिसर शेतकरी शेत मजूर वर्ग असलेला क्षेत्र आहे.तुम्हाला शाळा कॉलेज मध्ये पाठविण्यासाठी तुमचे वडील रात्रंदिवस काबाळ कष्ट करतात. ही तुमची वेळ केवळ आणि केवळ अभ्यासा वर लक्ष केंद्रित करण्याची असून मोबाईल चा गैर वापर,वेसन व इतर तत्सम सवयी पासून दूर राहून पालकांनी आपल्या रक्ताचा पाणी करून तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या संधीच सोन करा.असे आव्हान येथे स्व.सुधाकरराव नाईक कला व विज्ञान विद्यालय येथे फुलसावंगी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात मुख्य वक्ते प्रा.विठ्ठल कांगणे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे हे होते.
त्यांनी पुढे आपल्या भारदस्त व व्यंग करण्याच्या शैली मध्ये इंस्टाग्राम,फेसबुक सारख्या सोशल मीडिया चा विद्यार्थी कश्या प्रकारे गैर वापर करत आहे यावर त्यांनी भाष्य करत मोबाईल चा गैरवापर टाळण्या वर त्यांनी भर दिला.विद्यार्थी वेसनंधिंन होत आहेत यावर सुद्धा त्यांनी कटाक्षाने भाष्य केले.दरवर्षी फुलसावंगी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिना निमित्ताने विद्यार्थ्यांना केंद्र स्थानी ठेऊन विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.या वर्षी या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून महाराष्ट्र्रात आपल्या शिकवणी च्या पद्धतीने सुप्रसिद्ध असलेले प्रा.विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. स्व.सुधाकरराव नाईक विद्यालयात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.
यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव,पो.उप.नि.केशव पुंजमवार, प्रा.विनोद राठोड,प्रा.सुधीर भाटे, कुणाल नाईक, प्रा.चंद्रवनशी हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात च्या यशस्वीते साठी विवेक पांढरे,शैलेश वानखेडे, डॉ. गजानन वैद्य, शेख तसलीम ,विवेक शेळके,चंदू पंडागळे,संजय जाधव,विक्की भिसे,शैलेश पेंटेवाढ,सचिन छन्नीकर,शेख रिजवान यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रम चे संचलन तसलीम शेख यांनी तर आभार प्रदर्शन संजय जाधव यांनी केले.
