
शिर्डी येथे झालेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष,सर्व संचालक तथा सरव्यवस्थापक यांचा गौरव….!
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
उत्तरोत्तर य.जि.प.कर्मचारी पतसंस्थेची प्रगती पतसंस्थेचे अध्यक्ष मा.राजुदासभाऊ जाधव यांच्या नेतृत्वात होत गेली त्यांना सर्व संचालक मंडळींचे तेवढेच सहकार्य मिळाले.
याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा.काकासाहेब कोयटे,बुलडाणा अर्बन बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा.शिरीषजी देशपांडे,अहमद नगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक मा.अहिर साहेब यांनी शिर्डी येथील कार्यक्रमात य.जि.प.कर्मचारी पतसंस्था 109 ला राज्यस्तरीय दीपस्तंभ प्रथम पुरस्काराने सन्मानित केले.
हा सन्मानाचा दीपस्तंभ प्रथम पुरस्कार पतसंस्थेचे अध्यक्ष मा.राजुदासभाऊ जाधव,सचिव राजेंद्रभाऊ पिंपळशेंडे,पुसद शाखाप्रमुख नंदेशजी चव्हाण,वणी शाखाप्रमुख चित्तरंजनभाऊ कडू,संचालक गौतमभाऊ कांबळे,शेख लुकमान,अनिलराव सरताबे, अनिलराव जयसिंगपुरे,शंकरराव कोटनाके यांनी स्वीकारला.
